Homeदेश-विदेशTamilnadu : भाजप प्रदेशाध्यक्षांनी मारले स्वतःलाच चाबकाचे फटके; नेमकं प्रकरण काय?

Tamilnadu : भाजप प्रदेशाध्यक्षांनी मारले स्वतःलाच चाबकाचे फटके; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

नवी दिल्ली : तामिळनाडूमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई चांगलेच चर्चेत आले आहेत. द्रमुक सरकारविरोधात ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. शुक्रवारी (27 डिसेंबर) त्यांनी कोईम्बतूर येथील निवासस्थानाबाहेर स्वतःला चाबकाचे 6 फटके मारून घेतले. त्यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात घोषणा केली होती. “तामिळनाडूमध्ये जोपर्यंत द्रमुकचा पाडाव होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही. तसेच, पुढील 48 दिवस उपवास करणार आहे,” असा निर्णय त्यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) जाहीर केला. (Tamilnadu BJP leader Annamalai whips himself in protest against Anna University sexual assault)

हेही वाचा : Bogus Recruitment : कमांडो बनण्यासाठी तरुणांची गर्दी, पण भरतीच निघाली बोगस; तिघांना अटक 

पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी द्रमुकवर निशाणा साधला होता. अण्‍णा विद्यापीठातील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या संदर्भातील कागदपत्रे उघड केल्‍याने त्‍यांनी राज्यातील पोलिसांवर टीका केली. पोलिसांनी या प्रकरणामधील 19 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची ओळख उघड केली. तसेच, या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी द्रमुक नेत्‍यांशी संबधित संबंध असल्‍याने पोलिसांनी त्‍याचा गुन्‍ह्यातून उल्‍लेख वगळल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले.

स्वतःला चाबकाचे फटके मारल्यानंतर अण्णामलाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ज्यांना तमिळ संस्कृतीची आहे, त्यांनाच माझ्या आंदोलनाचा अर्थ समजेल. स्वतःला फटके मारणे, स्वतःला कठोर शिक्षा देणे, हे एका विधीसारखे आहे. हा आपल्या संस्कृतीचा भाग असून ही कृती कोणाच्याही विरोधात नाही, तर राज्यात गेल्या काही काळापासून सतत वाढत चाललेल्या अन्यायाविरोधातील कृती आहे. अण्णा विद्यापीठातील विद्यार्थीनीवरील अत्याचार हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे.” असे म्हणत त्यांनी घडलेल्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.

बुधवारी (25 डिसेंबर) तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी अण्णा विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी 37 वर्षीय आरोपीला अटक केली होती. या संदर्भात माहिती देण्यात आली की, आरोपीचे नाव ज्ञानशेखरन असे असून तो रस्त्याच्या बाजूला बिर्याणी विकत होता. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली तेव्हा पीडित मुलगी आणि तिचा मित्र नजीकच्या चर्चमध्ये प्रार्थना करून विद्यापीठ कॅम्पसमध्ये परतत होते. दोघांनाही एका निर्जन ठिकाणी या दोघांना थांबवले. हल्लेखोरांनी विद्यार्थिनीला मारहाण करून मुलीवर बलात्कार केला.


Edited by Abhijeet Jadhav