Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश DMK चे नेते ए.राजा यांच्यावर EC ची कारवाई; ४८ तासांसाठी प्रचारावर बंदी!

DMK चे नेते ए.राजा यांच्यावर EC ची कारवाई; ४८ तासांसाठी प्रचारावर बंदी!

Related Story

- Advertisement -

तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून या निवडणुकीचा प्रचार ४ एप्रिल रोजी संध्याकाळी संपणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याविरूद्ध अपमानकारक टीका करण्याच्या प्रकरणात द्रमुकचे नेते ए. राजा यांच्यावर कठोर कारवाई कऱण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत गुरुवारी आयोगाकडून ए. राजा यांच्या निवडणूक प्रचारावर ४८ तासांकरता बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने ए राजा यांचे विधान आचारसंहितेचे उल्लंघन केले असे म्हटले आहे.

दरम्यान, ए. राजा यांचे भाषण अपमानकारक आहे, यासह त्यांनी केलेलं विधान महिलांच्या सन्मानाविरूद्ध आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींचे हे गंभीर उल्लंघन असल्याचे आयोगाचे म्हणणं आहे. तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) सत्यब्रत साहू यांनी ए राजा यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) अहवाल पाठविला होता.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने त्यांच्या आदेशानुसार ए. राजा यांना फटकारत त्यांना द्रमुकच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. यासोबतच, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली. आयोगाने आपल्या आदेशात म्हटले की, ए. राजा यांना निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान भविष्यात सावध राहण्याची सूचना देत आहे. निवडणूक आयोगाकडून अश्लील, अपमानास्पद, अश्लील भाष्य करू नये व स्त्रियांच्या सन्मानाला इजा पोहोचवू नये अशा सूचनाही राजा यांना देण्यात आल्या आहेत. पलानीस्वामी यांच्या आईविरोधात झालेल्या कथित निंदनीय टीकेबद्दल आयोगाने द्रमुक नेते ए राजा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, यानंतर ३१ मार्चपर्यंत त्यांना उत्तर देण्यासही सांगितले होते. मात्र एआयएडीएमकेने द्रमुक नेत्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.


- Advertisement -