घरदेश-विदेशआठ वर्षांच्या मुलाची चार दिवस झुंज, बोअरवेलमधून बाहेर येताच चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं वाचा

आठ वर्षांच्या मुलाची चार दिवस झुंज, बोअरवेलमधून बाहेर येताच चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं वाचा

Subscribe

Tanmay Sahu Died | विशेष म्हणजे तन्मयच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले होता. त्याचबरोबर त्याला ऑक्सिजनचा पुरवठाही केला जात होता. तन्मयच्या सुरक्षेसाठी सतत प्रार्थना केल्या जात होत्या, पण त्या निष्पापाला जीव गमवावा लागला.

बैतूल – मध्य प्रदेशच्या बैतूल येथे 6 डिसेंबर रोजी तन्मय साहू (Tanmay Sahu) नावाचा 8 वर्षांचा मुलगा 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेलमध्ये पडून तो 55 फूटपर्यंत अडकला. त्याला वाचवण्यासाठी गेल्या ४ दिवसांपासून बचाव कार्य (Rescue Operation) सुरू होते. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास तन्मयला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तन्मयचा जीव वाचू शकला नाही.

हेही वाचा – मंदोस तामिळनाडूत धडकले; पाऊस-थंडीचा जोर वाढला, महाराष्ट्रात काय परिस्थिती?

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

तन्मयच्या वडिलांनी शेतात ट्युबवेलचे काम केले होते. त्याची पूजा करण्याकरता ते कुटुंबासह शेतात गेले होते. तेव्हा तिथे अनेक मुले खेळत होती. ही मुले खेळता खेळता नानक चौहान यांच्या शेतात गेले. तिथे बोअरवेल उघडी होती. खेळता खेळता तन्मय या बोअरवेलमध्ये पडला. ४०० फूट खोल ही बोअरवेल असून तन्मय ५५ फूट खोलीपर्यंत अडकून पडला होता.

- Advertisement -

हेही वाचा गुवाहाटीत अग्नितांडव! लागोपाठ १५ सिलिंडरचा स्फोट, अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

तत्काळ बचावकार्य सुरू

तन्मय पडल्याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. तब्बल ४८ तास पोकलेनने खोदकाम सुरू करण्यात आले. तन्मयला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम सतत बचावकार्य करत होती. बोअरवेलजवळ बोगदा करण्यात आला आणि त्यानंतर तन्मयला बाहेर काढण्यात आले. मात्र, तन्मयचा जीव वाचवण्यात यश आले नाही. तन्मयच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांने नजर

विशेष म्हणजे तन्मयच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले होता. त्याचबरोबर त्याला ऑक्सिजनचा पुरवठाही केला जात होता. तन्मयच्या सुरक्षेसाठी सतत प्रार्थना केल्या जात होत्या, पण त्या निष्पापाला जीव गमवावा लागला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -