Target Killings in Jammu Kashmir : काश्मीर खोऱ्यात वाढत्या टार्गेट किलिंगच्या घटना; अमित शहांची ३ जूनला एलजीसोबत बैठक

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उप राज्यपालांव्यतिरिक्त गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारी या बैठकीत सहभागी होतील

amit shah interview on 2002 gujarat riots supremecourt verdict cleat chit to narendra modi

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्याकांच्या टार्गेट किलिंगच्या घटना वाढत आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यांचा आता सर्वच स्तरातून जाहीर निषेध केला जातोय. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 3 जून रोजी जम्मू – काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि इतरांसह काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा काश्मीर खोऱ्यात नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांबाबत गृहमत्र्यांना माहिती देणार आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उप राज्यपालांव्यतिरिक्त गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारी या बैठकीत सहभागी होतील. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांचे टार्गेट किलिंग आणि प्रशासनाकडून अमरनाथ यात्रेच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. कारण महिन्याच्या अखेरीस अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे.

मनोज सिन्हा दिल्लीत दाखल होणार

गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, एलजी मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरमधील सद्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. दरम्यान जम्मू-काश्मीरमधील टार्गेट किलिंगबाबत विरोधी पक्ष नेत्यांकडून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. खोऱ्यात अलीकडेच झालेल्या टार्गेट किलिंगचा संदर्भ देत अब्दुल्ला म्हणाले की, सरकारने काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेच्या पैलूचा विचार करावा लागेल.

अलीकडेचं हिंदू शिक्षकाची हत्या

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मंगळवारी कुलगाममधील सरकारी शाळेत घुसून दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाच्या हत्येचा निषेध करत म्हटले की, हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल जो ते कधीही विसरणार नाहीत.

टीव्ही कलाकाराची हत्या

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवारी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले टीव्ही अभिनेता अमरीन भट आणि पोलीस कॉन्स्टेबल सैफुल्लाह कादरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गेल्या आठवड्यात दोघांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.


Arvind Kejriwal on Kashmiri Pandit : 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं तेच आजही घडतंय; अरविंद केजरीवालांचा दावा