Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत टाटा समूहाने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दिला व्हिआरएसचा पर्याय

टाटा समूहाने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दिला व्हिआरएसचा पर्याय

Subscribe

Voluntary Retirement Scheme for Air India Employees | तोट्यात गेलेल्या एअर इंडियालाही बाहेर काढलं. आजपासून ३० एप्रिलपर्यंत कर्मचारी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

Voluntary Retirement Scheme for Air India Employees | मुंबई – टाटा समूहाने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी योजना आणली आहे. या योजनेमुळे एअरलाईनमधील नॉन फ्लाईंग श्रेणीतील कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती (Voluntary Retirement Scheme) घेता येणार आहे. यामुळे ४० वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेले कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेऊ शकणार आहेत.

एअरलाईनमध्ये किमान पाच वर्षांच्या सतत सेवेचा कालावधी पूर्ण केलेल्या कायमस्वरुपी कॅडर अधिकारी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. तसंच, पाच वर्षे कायम सेवा पूर्ण केलेले लिपिक आणि नॉन स्किल श्रेणीतील कर्मचारी या योजनेसाठी पात्र आहेत. ३० एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एअर इंडियाच्या विमानात पुन्हा समस्या; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

टाटा समूहाने जानेवारी २०२२ मध्ये एअरलाईन आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून टाटा समूहाने सातत्याने नवनव्या योजना आणून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. तसंच, तोट्यात गेलेल्या एअर इंडियालाही बाहेर काढलं. आजपासून ३० एप्रिलपर्यंत कर्मचारी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. या कर्मचाऱ्यांना एक ग्रॅशिया आणि एक लाख रुपये परतावा मिळणार आहे. जून २०२२ मध्येही अशी योजना टाटा समूहाने आणली होती. त्यावेळी ४२०० पात्र कर्मचाऱ्यांपैकी १५०० कर्माचाऱ्यांनी स्वीकारली होती.

- Advertisement -

नॉन फ्लाईंग विभागात जवळपास ११ हजार कर्मचारी असून त्यापैकी २१०० कर्मचारी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामुळे यापैकी किती कर्मचारी योजनेसाठी अर्ज करतात हे पाहावं लागेल. या योजनेबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. एअरलाइनचे एचआर विभागातील वरिष्ठ अधिकारी सुरेश दत्त त्रिपाठी म्हणाले की, शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत मेमो पाठवण्यात आला आहे. या मेमोद्वारे स्वेच्छा निवृत्तीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यात म्हटलं आहे की, १७ मार्च २०२३ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. तसंच, जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत अर्ज करतील त्या पात्र कर्मचाऱ्यांना १ लाख अतिरिक्त देण्यात येईल.

- Advertisment -