घरताज्या घडामोडीTata Son's चे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Tata Son’s चे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Subscribe

टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली आहे. टाटा समूहाने सोमवारी याची पुष्टी करत नटराजन चंद्रशेखरन हे एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्याची घोषणा केली.

टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली आहे. टाटा समूहाने सोमवारी याची पुष्टी करत नटराजन चंद्रशेखरन हे एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्याची घोषणा केली. टाटा सन्सच्या बोर्डाने सोमवारी देशांतर्गत विमान कंपनीचे पुढील अध्यक्ष म्हणून चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. एअर इंडियाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती झाल्यानंतर एअर इंडिया आता कंपनीच्या सीईओ पदाच्या शोधात आहे. त्याचप्रमाणे जनरल इन्शूरन्स कॉर्पोरेशनचे माजी सीएमी एलिस गीवर्गीस वैद्यन आणि भारतीय यूनिलिव्हरचे चेअरमन संजीव मेहता यांचाही स्वतंत्र संचालक म्हणून बोर्डावर समावेश करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात टाटा सन्स लिमिटेने एन चंद्रशेखरन यांची पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या बैठकीत टाटा सन्स बोर्डाने मागील पाच वर्षांची समीक्षा केली आणि आपले कार्यकारी अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पुन्हा नियुक्त करण्याचा विचार केला. रतन टाटा यांना देखील या बैठकीत आमंत्रित केले होते. रतन टाटांनी चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात टाटा समूहाची झालेली प्रगती आणि प्रदर्शनeवर संतोष व्यक्त केला होता.

- Advertisement -

जानेवारी महिन्यात कर्जात बुडालेल्या एअरलाइनचा ताबा मिळवल्यानंतर टाटा कंपनीने १४ फेब्रुवारीला तुर्कीचे इल्कर आयसी यांची एअर इंडियाच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्त जाहीर केली होती. त्यांना कंपनीचे सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

इल्कर आयसी यांची एअर इंडियाच्या सीईओ आणि एमडी पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि टाटा समूहाचे आभार मानले होते.

- Advertisement -

चंद्रशेखरन यांनी काही दिवसांपूर्वी एअर लाइन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, टाटा समूह एअर इंडियाचे नेटवर्क वाढवण्याचा विचार करत आहे. त्याचप्रमाणे एअर इंडियाचे आधुनिकीकरण, ग्राहकांच्या सेवा आणि जगातील तांत्रिकदृष्ट्या प्रगत एअर लाइन बनवण्याचा विचार करत आहे. त्याचप्रमाणे एअर इंडियाच्या मूलभूत सेवांमध्ये सुधारणा, प्रवाशांच्या तक्रारींची निराकरण करणे, ग्राहकाची कॉल सेंटर सुविधा सारख्या अनेक गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल.


हेही वाचा – हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटचे थैमान; मृतांचा पडला खच

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -