घरदेश-विदेशफंडिंग प्रकरणी छोटे पक्ष प्राप्तिकर विभागाच्या रडारवर, मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमारी

फंडिंग प्रकरणी छोटे पक्ष प्राप्तिकर विभागाच्या रडारवर, मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमारी

Subscribe

मुंबई : फंडिंगप्रकरणी नोंदणीकृत नसलेले छोटे पक्ष सद्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने गेल्या दोन दिवसांपासून अशा पक्षांवर छापेमारी सुरू केली आहे. मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातमधील अशा 123 छोट्या पक्षांच्या कार्यालयांवर छापे टाकले असून मुंबईतील आज सायन व बोरिवली परिसरात छापेमारी करण्यात आली.

कोट्यवधी रुपयांच्या करचोरीप्रकरणी प्राप्तिकर विभागाने काल गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह देशातील अनेक राज्यांत छापे टाकले. सरकारी नोंदीनुसार देशात सुमारे 2 हजार 44४ नोंदणीकृत पक्ष आहेत. हे पक्ष राजकीय दृष्ट्या सक्रिय नसल्याने त्यांची नावे देखील सामान्य नागरिकांना माहिती नाहीत. तसेच या पक्षांची नोंदणी झाली असली तरी, निवडणूक आयोगाकडून त्यांना मान्यता मिळालेली नाही. प्राप्तिकराच्या कलम 80 GGCनुसार लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29A अंतर्गत, नोंदणीकृत असेलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला एखादी व्यक्ती कितीही रक्कम दान करू शकते. त्यानंतर देणगीदाराला त्या रकमेवर 100 टक्क्यांपर्यंत करसवलत मिळू शकते.

- Advertisement -

अशा पक्षांचे पेव फुटलेले असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या पक्षांमार्फत सुरू असलेल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. आज मुंबईत बोरीवली व सायन येथे काही ठिकाणी छापे टाकण्यात आले.

सायन कोळीवा़डा परिसरातील एका झोपडपट्टीत तसेच बोरिवलीच्या एका छोट्या फ्लॅटमध्ये कार्यालय थाटलेल्या, पण सक्रिय नसलेल्या पक्षांवर छापे टाकण्यात आले. या दोन्ही पक्षांनी गेल्या दोन वर्षांत हवाला रॅकेटच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपयांच्या देणग्या जमा केल्या. पण त्यावरील कर भरण्यात आला नव्हता. शिवाय, या दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी जमा रकमेवर 0.1 टक्का कमिशन घेतले होते, असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, सायनमध्ये जेमतेम 100 चौरस फुटाच्या झोपडीतून एका पक्षाचे काम सुरू होते आणि त्याचा अध्यक्ष केवळ ‘स्टेट्स’साठी बनला होता. अहमदाबादच्या एका ऑडिटरकडून व्यवहार हाताळले जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -