घरताज्या घडामोडीIncome Tax Filing : आयकर विभागाच्या 'या' निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा,...

Income Tax Filing : आयकर विभागाच्या ‘या’ निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या निर्णय

Subscribe

आयकर विभागाकडून करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाहीये. असे करदाते ही प्रक्रिया २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करू शकतात, असा निर्णय आयकर विभागाकडून घेण्यात आल्यामुळे अनेक करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आयकर दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन १२० दिवसांमध्ये करावी लागते. तसेच नियमांनुसार, डिजीटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यावर त्याचा आधार, ओटीपी आणि नेटबँकींग द्वारे पाठवण्यात आलेला कोड व्हेरिफाय करावा लागतो. त्याशिवाय करदाते बंगळुरूमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर कार्यालयात आयटीआर कार्यालयात एक प्रत पाठवून व्हेरिफिकेशन करता येऊ शकते. मात्र, जो पर्यंत व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत आयकर विवरण दाखल केले जाऊ शकत नाही.

- Advertisement -

आर्थिक वर्ष २०२०-२१ करीता आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. ITR दाखल करण्यासाठी शेवटची मुदत ३१ डिसेंबर आहे. परंतु ही मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.


हेही वाचा : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कायदेशीर पेच, नाना पटोले दिल्लीत हायकमांडला

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -