घरताज्या घडामोडीऑनलाईन क्लासदरम्यान मुलांसमोरच झाला शिक्षिकेचा मृत्यू!

ऑनलाईन क्लासदरम्यान मुलांसमोरच झाला शिक्षिकेचा मृत्यू!

Subscribe

जगभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी शाळाही बंद आहेत. मार्च महिन्यांपासून भारतातही शाळा बंद आहेत. अनेक देशांमध्ये आता ऑनलाईन शिक्षणाला सुरूवात झाली आहे. दरम्यान ऑनलाईन क्लास सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलांना ऑनलाईन शिकवत असताना एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे.

झूम वर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेताना महिला प्राध्यापकाची तब्येत बिघडली. काही दिवसांपूर्वी या शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली होती. तरीही ही शिक्षिका मुलांना ऑनलाईन शिकवत होती. मात्र बुधवारी क्लास सुरू असताना या शिक्षिकेची तब्येत अचानक बिघडली. आणि शिक्षिकेने विद्यार्थ्यांसमोरच अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना शिक्षिकीचे तब्येत बिघडली आहे हे लक्षात येताच त्यांनी रूग्णवाहिका पाठवण्यासाठी प्राध्यापिकांच्या घरचा पत्ता विचारला. मात्र शिक्षिकेला काहीच बोलता आले नाही, मदत मिळण्या आधीच तीचा मृत्यू झाला. अर्जेटींनामध्ये बुधवारी ही घटना घडली. मृत शिक्षिकेचं नाव पाओला डी सिमोने असल्याचे कळले त्या ४६ वर्षांच्या होत्या.


हे ही वाचा – धक्कादायक! रस्त्यावरच्या कुत्र्यांचा मेकओव्हर, कान- शेपटी कापून केली विक्री!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -