राहुल गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांचे पोस्टर फाडल्याने कर्नाटकात राजकीय वातावरण तापले

याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपच्या नेत्यांचा जाहीर निषेध केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेते मंडळींनी केला आहे.

काँग्रेस(congress) नेते राहुल गांधी(rahul gandhi) सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं स्वागत करण्यासाठी कर्नाटकात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. मात्र राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचे पोस्टर्स पाडण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपच्या(bjp) नेत्यांचा जाहीर निषेध केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेते मंडळींनी केला आहे.

हे ही वाचा – रक्ताची नाती कधीच संपत नसतात, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

या सर्व प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या(siddharamayya) म्हणाले, “ते आमचे पोस्टर आणि फ्लेक्स फाडत आहेत. तर त्यांना मला इशारा द्यायचा आहे की, जर ते असं काही करत राहिले तर त्यांना कर्नाटकमध्ये (karanataka) मोकळेपणाने फिरता येणार नाही. राज्यातील आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एवढी ताकद आहे हे लक्षात ठेवा” असा थेट इशाराच सिद्धरमय्या यांनी भाजपाला दिला.

हे ही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गेंचा अर्ज दाखल, थरूर यांच्याशी थेट लढत

या सर्व प्रकरणी त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी पोलिसांशी चर्चा केल्याची सुद्धा माहिती समोर आली. ““पुढील सहा महिन्यात सरकार बदलणार आहे, हे पोलिसांनी लक्षात ठेवावं. काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे आणि मी पोलिसांनाही हाच इशारा देत आहे”. असंही सिद्धरमय्या म्हणाले.

दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर(bharat jodo yatra) आहेत. राहुल गांशी यांची ही यात्रा शुक्रवारी कर्नाटकमध्ये दाखल झाली. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी सिद्धरमय्या यांच्यासह काँग्रेसचे इतर नेतेही कर्नाटकच्या सीमेवर उपथित होते.

हे ही वाचा – भारतात शांतता संविधानामुळे नाही, हिंदुंमुळे; सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अश्विनी उपाध्यायांचे मत