घरदेश-विदेशदिवाळीच्या शॉपिंगसाठी स्कूटर दिली नाही म्हणून खून

दिवाळीच्या शॉपिंगसाठी स्कूटर दिली नाही म्हणून खून

Subscribe

दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी शेजाऱ्याकडे स्कूटर मागितली, मात्र त्याने देण्यास नकार दिल्यामुळे तरुणाने चक्क त्याची हत्याच केली.

दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी शेजाऱ्याला स्कूटर मागितली मात्र त्याने देण्यास नकार दिल्यामुळे एका माथेफिरू तरुणाने चक्क त्याचा खुनच केला. ही घटना बुधवारी संध्याकाळी दिल्ली येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश असे या आरोपीचे नाव असून, त्याने १९ वर्षीय दिपक उर्फ बल्लीची चाकू खुपसून हत्या केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ज्या चाकूने खून केला गेला,तो ही पोलिसांनी जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण

बुधवारी सायंकाळी योगेशने काश्मीरी गेट येथील तिबेटी बाजारात कपडे खरेदी करण्यासाठी दिपकसोबत स्कूटरवर येण्याची विनंती केली. मात्र दिपकने त्याला नकार दिला. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर शिवीगाळीत आणि नंतर हाणामारीत झाले, अशी माहिती उत्तर पश्चिम पोलीस ठाण्याचे अतिरीक्त आयुक्त असलम खान यांनी दिली. योगेशच्या पालकांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी दोघांच्या भांडणात पडत भर रसत्यातच योगेशला चोप दिला. योगेशला मात्र या घटनेमुळे खुप राग आला आणि त्याने दीपकला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्यातला वाद मिटवल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतले होते.

- Advertisement -

परंतु योगेशच्या मनातला राग त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. गुरूवारी दुपारी जेव्हा योगेश दीपकच्या समोर आला, तेव्हा त्याने पुन्हा भांडण उकरून काढले. पुन्हा एकदा त्यांच्यात खटके उडाल्यानंतर योगेशने आपल्या जवळील चाकू दीपकच्या छातीत खुपसला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

स्थानिक नागरिकंनी जखमी अवस्थेतील दिपकला  बाबू जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. योगेशच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -