घरदेश-विदेशTejashwi Yadav : बिहार विधानसभेत तेजस्वी यादवांची जोरदार फटकेबाजी, नितीश कुमारांना सुनावले...

Tejashwi Yadav : बिहार विधानसभेत तेजस्वी यादवांची जोरदार फटकेबाजी, नितीश कुमारांना सुनावले खडेबोल

Subscribe

पाटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना इंडिया आघाडीला सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज बिहार विधानसभेत एनडीए सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि नितीश कुमार प्रणीत एनडीए सरकारने विश्वासप्रस्ताव जिंकला. परंतु, यानंतर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभेत भाषण करत मुख्यंमत्री नितीश कुमार यांना खडेबोल सुनावले आहेत. (Tejashwi Yadav gave harsh words to Nitish Kumar in Bihar Assembly)

हेही वाचा… Sushilkumar Shinde On Ashok Chavan: काँग्रेस नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही – सुशीलकुमार शिंदे

- Advertisement -

बिहार विधानसभेतील बहुमत चाचणीनंतर माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटले की, पाच वर्षांच्या कार्यकाळात एका मुख्यमंत्र्याने तीनदा शपथ घेतल्याचे मी प्रथमच पाहिले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणतात की भाजपा ही त्यांची आई आहे, मी म्हणेन की आरजेडी त्यांची आई आहे, कारण ते येथे प्रथम होते. विजय कुमार सिन्हा यांच्याबद्दल मला असे म्हणायचे आहे की ते एकाच टर्ममध्ये विरोधी पक्षनेते, आणि उपमुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मी आदर करतो आणि या पुढेही करत राहीन. तुम्ही सर्व प्रभू श्री रामाची चर्चा करता. आपण सर्वच मनात रामाचा जप करतो. पण मी नितीश यांना दशरथाप्रमाणे वडील मानतो. बऱ्याचवेळा यांनी तुम्हा सर्वांच्या समोर म्हटले की, मी भविष्यात खूप पुढे जाईल. सर्व काही करेल. पण माझ्याविषयी इतकं काही बोलणार नितीश कुमार यांच्या मनात नेमके असे काय आले की त्यांनी पुन्हा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, हे त्यांनी स्पष्ट करावे, असा प्रश्न तेजस्वी यादव यांनी विधानसभेत उपस्थित केला.

- Advertisement -

बिहारमधील लोकांना जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कधी इकडे, तर कधी तिकडे असे का करता? 2020 च्या निवडणुकांनंतर युती आणि आघाडीमध्ये केवळ 12 हजार मतांचा फरक होता. पण तेव्हा मात्र, तुम्ही म्हणाले होता की आमचे एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे विरोधकांची एकजूट. आम्हाला पंतप्रधान व्हायचे नाही किंवा अन्य कोणतेही पद नको. पण आता तुम्ही राज्यपाल भवनात जाऊन काही वेगळेच सांगत आहात. तुमचे इंडिया आघाडीत मन रमले नाही, असे तुमच्याकडून सांगण्यात आले आहे. मग आम्ही तुमच्यासोबत तिथे काही नाच-गाणे करण्यासाठी नव्हतो तर तु्म्हाला पाठिंबा देण्यासाठी होतो, असा टोलाही यावेळी तेजस्वी यादवांनी नितीश कुमारांना लगावला. तर, तुम्ही ज्या गोष्टीला अशक्य म्हणता ते आम्ही शक्य करून दाखवले आहे, असेही तेजस्वी यादव यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -