घरदेश-विदेशTelangana : ढोंग या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे भाजपा, ठाकरे गटाची जोरदार...

Telangana : ढोंग या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे भाजपा, ठाकरे गटाची जोरदार टीका

Subscribe

मुंबई : तेलंगणा विधानसभेत अकबरुद्दीन ओवैसी यांना नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणून नेमण्यात आले. आता भाजपाचे जे आठ आमदार निवडून आले आहेत, त्यांनी असे ढोंग रचले आहे की, काही झाले तरी आम्ही विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार नाही. पण ज्युनियर ओवैसी प्रोटेम स्पीकर झाले ते राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्या आदेशाने. त्यामुळे बहिष्काराची ही नौटंकी भाजपा आमदारांनी राजभवनात जाऊन करायला हवी होती. राज्यपाल भाजपाचे. आदेश राज्यपालांचा, पण भाजपाने गरळ ओकली ती प्रोटेम स्पीकर अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविरुद्ध. भारतीय जनता पक्षाचे हे वागणे आता आश्चर्यकारक राहिलेले नाही. ढोंग या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे भाजपा, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – IT Raid On Dhiraj Sahu : धीरज साहू भाजपात आले तर क्लीनचिट देणार का? ठाकरे गटाचा सवाल

- Advertisement -

तेलंगणाच्या विधानसभेत अकबरुद्दीन ओवैसी यांना नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणून नेमण्यात आले. नियमानुसार सभागृहात जो सगळ्यात ज्येष्ठ सदस्य असतो, त्यास शपथ सोहळ्यापुरते विधानसभा अध्यक्षपदी बसवून कामकाज पुढे नेले जाते. त्यानुसार अकबरुद्दीन ओवेसी यांची नियुक्ती झाली. आता भाजपा म्हणते आम्ही हिंदुत्ववादी असून ओवैसी यांच्याकडून शपथ घेणे आमच्या हिंदुत्वास बाधा आणू शकेल. तेलंगणात प्रोटेम स्पीकरचा विरोध हे एक ढोंग आहे. अशा रोजच्या ढोंगांना जनता कंटाळली आहे. त्या ढोंगांना साथ देणारे पक्ष व पुढारी इतिहासाच्या पानावरून नष्ट होतील, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

हेही वाचा – Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंना भरसभेत दाखवले काळे झेंडे! परभणीतील घटना

- Advertisement -

तेलंगणात भाजपाच्या आठ आमदारांनी असे ढोंग रचले आहे की, काही झाले तरी आम्ही विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार नाही. भाजपाने यानिमित्ताने हिंदुत्वाचा बुरखा घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांच्या या नाटकानेच त्यांचा हा बुरखा फाडला. भाजपाचे ढोंगी हिंदुत्व उघडे पडले. दूध का दूध पानी का पानी झाले. सगळ्यात ज्येष्ठ विधानसभा सदस्य म्हणून राज्यपालांनीच घटना-नियमानुसार ओवैसी यांची नियुक्ती केली. म्हणजे भाजपा नियुक्त राज्यपालांनी ओवैसी यांची नियुक्ती करायची आणि नंतर भाजपाच्याच नवनिर्वाचित आमदारांनी ओवैसी यांच्या नावाने बोंब ठोकत हिंदुत्वाचे ढोंग करायचे, असा हा प्रकार असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक; सोलापुरातील घटनेने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -