घरदेश-विदेशनिवडणूक जिंकण्यासाठी घुबडाचा वापर; तेलंगणाच्या राजकारण्यांची नवी शक्कल

निवडणूक जिंकण्यासाठी घुबडाचा वापर; तेलंगणाच्या राजकारण्यांची नवी शक्कल

Subscribe

निवडणूक जिंकण्यासाठी तेलंगणाचे राजकारणी घुबडच्यामार्फत काळ्या जादूटोणा करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ इसमांना अटक केली आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी राजकारणी कुठल्या थरावर जावून पोहचतील याचा अंदाज लावता येणार नाही. निवडणूक जिंकता यावी यासाठी ते वेगवेगळ्या शक्कल लढवीत असतात. कुणी मतदारांच्या घरोघरी जावून प्रचार करतं, तर कुणी पैसे वाटून प्रचार करतं, कुणी समाज माध्यमांतून प्रचार करतं, तर कुणी रॅली काढून प्रचार करतं. मात्र, तेलंगणातील राजकारण्यांनी या सगळ्या पर्यायांना मागे टाकत निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा नवा पर्याय शोधून काढला आहे. ही मंडळी आता विरोधकाला पराभूत करण्यासाठी घुबडच्यामार्फत काळा जादूटोणाचा करीत आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये घुबडांचे तस्करी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा – महिलांना आकर्षित करण्यासाठी त्याने घुबडाचा बळी दिला

- Advertisement -

घुबडची तस्करी करणाऱ्या ६ इसमांना अटक

तेलंगणाच्या सीमाभागावर असलेल्या कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम तालूक्यात घुबड तस्करी करणाऱ्या ६ इसमांना पोलिसांनी अटक केली आहे. तोलंगणाच्या राजकारण्यांनीच ही घुबड मागितले असल्याचे त्या इसमांनी पोलिसांना सांगितले. विरोधकाला पराभूत करण्यासाठी घुबडमार्फत काळा जादूटोणा केली जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. येत्या ७ डिसेंबरला तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेलंणामध्ये मोठ्या प्रमाणात आणि खालच्या पातळीचे आरोप-प्रत्यारोप होत आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका हा त्याचाच एक भाग आहे. आता त्यात निवडणूक जिंकण्यासाठी काळ्या जादूटोणाचा केला जाण्याचा वापरसंबंधित बाब समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – पुण्यात ‘उलूक महोत्सव’

- Advertisement -

 

एका घुबडची किंमत तीन ते चार लाख

काही दिवसांपूर्वी काळ्या जादूटोणासंबंधित अशीच एक बातमी समोर आली होती. दिल्लीतील एक तरुण महिलेला आकर्षित करण्यासाठी घुबडाच्या सहाय्याने जादूटोणा करत होता. यासाठी त्याने घुबडला मारुन टाकले होते. असाच काहीसा प्रकार आता तेलंगणामध्ये घडत आहे. या जादूटोणासाठी पुरवले जाणारे घुबड हे कर्नाटकातून येत असल्याची माहिती एका वनअधिकाऱ्याने दिली आहे. कर्नाटकात मोठे घुबडचे जाळे आहे. कर्नाटकातून तेलंगणात तस्करी होणाऱ्या एका घुबडला तीन ते चार लाखाने विकले जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.


हेही वाचा – जरा जपून! फटाक्यांमुळे पशू-पक्षी होतायत जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -