भाजप आमदार टी. राजा सिंह यांना अटक, मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलं आक्षेपार्ह वक्तव्य

telangana bjp mla t raja singh arrested over remarks on prophet mohammad

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांना अटक करण्यात आली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे. टी. राजा यांच्या वक्तव्यानंतर हैदराबादमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरून उतरून आंदोलन करत आहे. यानंतर आज सकाळी टी. राजा यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या, एवढचं नाही तर डबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मीर चौका पोलिस ठाण्यांबाहेर मोठ्या संख्येने लोक तक्रारी दाखल करण्यासाठी जमा होत आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे संतप्त लोकांनी सांगितले.

टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने सुरू झाली. त्याच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्याच्या आईवरही भाष्य केले आहे.

टी. राजा सिंह हे हैदराबादच्या गोशामहल मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. याप्रकरणी त्याला पोलिस कोठडीही घेण्यात आली होती. आमदार टी राजा सिंह यांनी मुनव्वर फारुकीचा शो रद्द करण्याबाबत बोलले होते. त्यामुळे यानंतर सुमारे 50 लोक परिसरात पोहोचले होते, मात्र सर्वांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले.

टी. राजा यांच्याआधी नुपूर शर्मानेही एका टीव्ही चॅनलवर प्रेषित मोहम्मदबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर देशभरातून त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. त्याच्यावर देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पैगंबर यांच्यावरील वक्तव्यावरून वाढत्या वादानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

टी. राजा यांचे पक्षातून निलंबन

दरम्यान या प्रकरणनंतर आमदार टी. राजा यांना भाजपमधून निलंबिक करण्यात आले आहे. तसेच पक्षाकडून टी. राजा यांच्या कारवाईबाबत 10 दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंगळवारी टी. राजा यांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही तासांत आज भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.


मुंबईतील ललित हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; फोनवरून 5 कोटींच्या खंडणीची मागणी