नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर थेट अमेरिकेकडून लाचखोरीचे आरोप झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी अदानींनी दिलेली 100 कोटी रुपयांची देणगी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी स्वत: माध्यमांसमोर यासंबंधी भाष्य केले. (Telangana Chief Minister Revanth Reddy rejects Adani Rs 100 crore donation)
गौतम अदानी यांनी 18 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी कौशल्य विद्यापीठाला देणगी म्हणून 100 कोटी रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र राज्यातील गौतम अदानी यांच्या गुंतवणुकीवर विरोधकांकडून रेवंत रेड्डी सरकारवर हल्लाबोल होत आहे. याचपार्शभूमीवर आजा हैदराबादमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना रेड्डी म्हणाले की, आमच्या सरकारने अदानींकडून मिळणारी देणगी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही दबावाशिवाय घेतला आहे. तसेच आपल्यावर कोणी दबाव आणला तर ते मी मान्य करणार नाही.
हेही वाचा – Supreme Court : राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष-समाजवाद शब्द काढून टाकण्याची मागणी; न्यायालयाने याचिका फेटाळली
अडानी के ऊपर लगे भ्रष्टाचार के आरोपों के बीच तेलंगाना की कांग्रेस सरकार ने ये फैसला लिया है कि हम युवाओं के स्किल डेवलपमेंट के लिए उनके द्वारा दिया 100 करोड़ का डोनेशन नहीं लेंगे।
: तेलंगाना के मुख्यमंत्री @revanth_anumula जी pic.twitter.com/s8CDDydBGU
— Congress (@INCIndia) November 25, 2024
रेवंत रेड्डी म्हणाले की, अदानी समूहावर काही आरोप झाले आहेत. त्या आरोपांमध्ये तेलंगणा राज्याचा उल्लेख होता. परंतु तेलंगणाला या संपूर्ण वादापासून दूर ठेवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. तसेच आतापर्यंत 100 कोटी रुपयांचा एक रुपयाही सरकारकडे आलेला नाही, असा दावाही रेड्डी यांनी केला. त्यांनी सांगितले की, आम्ही सरकार चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही. त्यामुळेच कौशल्य विद्यापीठाला मिळणारा निधी न घेण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे, असे रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Waqf Board Amendment Bill : वक्फ मालमत्ता बळकावण्यासाठी…; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे गंभीर आरोप