घरदेश-विदेशTelangana Election : BRS आमदाराच्या घरी आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे

Telangana Election : BRS आमदाराच्या घरी आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे

Subscribe

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी बीआरएसचे विद्यमान आमदाराच्या घरावर आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. या आमदाराचे नाव नल्लामोथू भास्कर राव असे आहे. यामुळे प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नल्लामोथू भास्कर राव यांच्या निकटवर्ती यांच्या घरवर देखील छापे टाकण्यात आले आहेत.

नल्लामोथू भास्कर राव हे मिर्यालागुडा येथून आमदार आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहे. नल्लामोथू भास्कर राव हे मूळचे नलगोंडा जिल्ह्यातील निदामनुन मंडळातील शाकापुरम गावाचे रहिवासी आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – …तर महाराष्ट्राचा युपी, बिहार होईल; राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती

2014 आणि 2018 या विधानसभा निवडणुकीत नल्लामोथू भास्कर राव हे दोन वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. नल्लामोथू भास्कर राव हे 1969 मध्ये तेलंगणा राज्याच्या आंदोलनात सामील झालेल्या नेत्यांपैकी ते एक होते. त्यावेळी एसआर-बीजीएनआर कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचे नल्लामोथू भास्कर राव हे सचिव होते. यापूर्वी प्राप्तिकर विभागाने 13 नोव्हेंबरला तेलंगणाच्या मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांच्या निकटवर्ती यांच्या घरीही छापे टाकले होते. सबित रेड्डी 2019 पासून तेलंगणाच्या शिक्षणमंत्री होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणा दरम्यान ‘ती’ चढली खांबावर; तेलंगणातील सभेमधील प्रकार

पंतप्रधानांनी विनंती केल्यानंतर ती खाली उतरली

तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका मुलीने लाईट लावलेल्या टॉवरवर चढली. आपल्या समस्यांबाबत बोलण्याच्या अट्टाहासाने रॅलीत पोहोचलेल्या तरुणी ही लाईट लावलेल्या टॉवरवर चढली होती. तरुणीला पाहताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला तातडीने खाली उतरण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवून तरुणीला खांबावरून खाली उतरण्याचे आवाहन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “आम्ही तुझ्या सोबत आहोत. या वायरची स्थिती चांगली नाही. शॉर्ट सर्किट होऊ शकते. यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही. मी तुमच्यासाठी आलो आहे. मी तुझे ऐकेन. पंतप्रधानांच्या व्हीव्हीआयपी कार्यक्रमात झालेला व्यत्यय आणि बराच वेळ आपल्या आग्रहावर ठाम असलेली ही तरुणी पाहून तेथे उपस्थित इतर लोकही हैराण झाले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -