घरदेश-विदेशतेलंगणामध्ये शालेय बस पुराच्या पाण्यात बुडाली; ३० विद्यार्थ्यांना स्थानिकांनी सुखरूप बचावले

तेलंगणामध्ये शालेय बस पुराच्या पाण्यात बुडाली; ३० विद्यार्थ्यांना स्थानिकांनी सुखरूप बचावले

Subscribe

३० शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पाण्यात बुडाल्याची घटना तेलंगणात घडली. तेलंगणाच्या महबूबनगरमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली.

३० शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पाण्यात बुडाल्याची घटना तेलंगणात घडली. तेलंगणाच्या महबूबनगरमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. शालेय बस जवळपास बुडाली होती. मात्र, उपस्थिती स्थानिकांनी विद्यार्थ्यांना शर्तीच्या प्रयत्यांनी वाचवले. (Telangana school bus carrying 30 students partially submerged in a flooded street Mahbubnagar)

विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर पाण्याच अडकलेली बस बाहेर काढण्यात आली. पूरग्रस्त अंडरब्रिज रस्त्यावर ३० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पाण्यात अंशतः बुडाली होती. बसचालक अंडरब्रिजवरून गेल्याने पाणी वाढल्याचा दावा स्थानिकांनी केला. चालक आणि स्थानिक लोकांनी शाळेतील मुलांना सुखरूप बाहेर काढले.

- Advertisement -

तेलंगणात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. जोराचा वारा आणि मुसळधार पावसामुळे तेलंगणातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. परिणामी, शुक्रवारी सकाळी रेल्वे अंडर ब्रिज ओलांडताना स्कूल बस अचानक पुरात बुडाली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महबूबनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण तेलंगणा राज्यात सक्रिय मान्सूनमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये रंगारेड्डी, मेडचल-मलकाजगिरी, यदाद्री-भोंगीर, कामरेड्डी, जानगाव, राजन्ना सिरसिल्ला आणि जगतियाल यांचा समावेश आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, येत्या काही दिवसांत तेलंगणामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात आणि त्याच्या लगतच्या भागात चक्रीवादळाचे क्षेत्र देखील कायम आहे.


हेही वाचा – संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -