घरElection 2023Telangana DGP : तेलंगणाच्या महासंचालकांना 'ती' एक चूक पडली महागात, ECI ने...

Telangana DGP : तेलंगणाच्या महासंचालकांना ‘ती’ एक चूक पडली महागात, ECI ने केली निलंबनाची कारवाई

Subscribe

तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी काल रेवंथ रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. पण आता त्यांना त्यांच्या या कृतीमुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

हैदराबाद : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या चार राज्यांचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. यांतील 3 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली असून एका राज्यांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उत्तरेत भाजपाचे प्राबल्य तर दक्षिणेच्या राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता काबिज केली आहे. तेलंगणा राज्यात 119 विधानसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडले होते. यांतील 64 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तेलंगणाचा निकाल दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास स्पष्ट झाला होता. ज्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. नेत्यांनी येऊन या विजयाचे शिल्पकार रेवंथ रेड्डी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्याचवेळी तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी सुद्धा रेवंथ रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. पण आता त्यांना त्यांच्या या कृतीमुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. (Telangana’s director general makes ‘that’ mistake, ECI suspends him)

हेही वाचा – Assembly Election Result 2023 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी काल (ता. 03 डिसेंबर) तेलंगणात काँग्रेसचे स्पष्ट होताच या विजयाचे शिल्पकार असलेले रेवंथ रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पोलीस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल (खर्च) अधिकारी महेश भागवत हे देखील उपस्थित होते. या पोलीस अधिकाऱ्यांनी रेड्डी यांची फक्त भेटच नाही घेतली तर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही केले. पण त्यांच्या या कृतीवर आता निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तर अंजनी कुमार यांची ही चूक त्यांना इतकी महागाचत पडली आहे की त्यांना थेट निलंबनाच्या कारावाईला सामोरे जावे लागले आहे. Election Commission Of India कडून ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सदर प्रकारावर नाराजी व्यक्त करत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अंजनी कुमार यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने सदर वृत्त एक्स या सोशल मीडिया साईटवर दिले आहे.

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्याचे महासंचालक अंजनी कुमार यांनी राज्याचे पोलीस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल (खर्च) अधिकारी महेश भागवत यांच्यासह उमेदवार असलेल्या रेवंत रेड्डी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनही केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे रेवंथ रेड्डी हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने या भेटीवर आक्षेप घेतला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आचारसंहिता सुरू असताना सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेली ही भेट आक्षेपार्ह असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या भेटीचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -