Wednesday, June 9, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग पृथ्वीचं आयुष्य फक्त ५ वर्ष उरलंय! प्रसिद्ध टेलिवँजलिस्ट रॉबर्टसन यांचं भाकित!

पृथ्वीचं आयुष्य फक्त ५ वर्ष उरलंय! प्रसिद्ध टेलिवँजलिस्ट रॉबर्टसन यांचं भाकित!

Related Story

- Advertisement -

जगबुडीची भाकितं आपल्यासाठी काही नवी नाहीत. तशी ती समस्त जगासाठीही नवी नाहीत. आजपर्यंत अनेकदा अशा प्रकारची भाकितं करण्यात आली आहेत. त्या प्रत्येक वेळी त्यावर मोठी चर्चा देखील झाली आहे. मात्र, शेवटी ते भाकित खोटं ठरल्याचं सगळ्यांनी पाहिलं आहे. मात्र, प्रसिद्ध अमेरिकन टेलिवँजलिस्ट (Televangelist) अर्थात टीव्ही पंडित पॅट रॉबर्टसन (Pat Robertson) यांनी येत्या ५ वर्षांत पृथ्वी नामशेष होणार असल्याचं (end of the world) भाकित केलं आहे. अमेरिकेतील लोकप्रिय अशा ‘द ७०० क्लब’ या कार्यक्रमात पॅट रॉबर्टसन यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी रॉबर्टसन यांनी अमेरिकेतील निवडणुकांचं देखील भाकित केलं. मात्र, त्यानंतर पाचच वर्षांमध्ये पृथ्वी नामशेष होणार असं सांगताच मुलाखतकारासोबतच प्रेक्षकच देखील अचंबित झाले. रॉबर्टसन यांनी हे सगळं कसं घडेल याची सविस्तर माहिती दिली आहे.

पृथ्वी नष्ट होणार हे नक्की आहे!

पॅट रॉबर्टसन यांनी बोलताना पृथ्वी (earth) कशी नष्ट होईल, याची प्रक्रिया सांगितली आहे. ‘सध्या जगात अण्वस्त्रांचा बोलबाला आहे. तिसरं महायुद्ध झालं तर ते अण्वस्त्रांनी होईल असं म्हटलं जातं. अण्वस्त्रांमुळेच जग नामशेष होऊ शकतं असं देखील सांगितलं जातं. मात्र, आपण मनुष्यप्राणी अण्वस्त्रांमुळे जग नामशेष होऊ देणार नाही. आपण ते थांबवू. पण आता पृथ्वीचा शेवट जवळ आला आहे. पुढची ५ वर्ष पृथ्वीवर शांतता नांदणार आहे. मात्र, ५ वर्षांनी पृथ्वी नामशेष होऊन जाईल. एक महाकाय ऊल्का (asteroid) तेव्हा पृथ्वीवर येऊन आदळणार आहे. ही उल्का इतकी प्रचंड असेल, की त्याच्या भीषण धक्क्यामुळे पृथ्वीवरचं जीवन पूर्णपणे नष्ट होईल. कदाचित तोच मानवजातीचा शेवट असेल’, असं पॅट रॉबर्टसन या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

ट्रम्प यांचा विजयही निश्चित!

- Advertisement -

दरम्यान, अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पच (President Donald Trump) विजयी होतील, असं भाकित देखील पॅट रॉबर्टसन यांनी वर्तवलं आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या ओपिनियन पोल्सनुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन अध्यक्ष होतील असे निष्कर्ष आले आहेत. मात्र, पॅट रॉबर्टसन यांच्यामते, ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होतील. त्यानंतर त्यांच्यावर २ वेळा जीवघेणा हल्ला होणार आहे, असं देखील ते म्हणले.

द न्यू मिलेनियम…!

पॅट रॉबर्टसन सध्या ९० वर्षांचे आहेत. याआधी देखील त्यांनी दोन वेळा पृथ्वी नामशेष होणार असल्याचं भाकित केलं होतं. १९७६मध्ये ते म्हणाले होते की १९८२ मध्ये पृथ्वी नष्ट होईल. मात्र, तसं झालं नाही. त्यानंतर १९९०मध्ये त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘द न्यू मिलेनियम’ (The New Millennium) या पुस्तकात देखील त्यांनी २९ एप्रिल २००७ रोजी पृथ्वी नष्ट होणार असल्याचं भाकित केलं होतं.

- Advertisement -