घरदेश-विदेश‘वायू’ चक्रीवादळ : सुरक्षेसाठी चीनची जहाज भारताच्या आश्रयाला

‘वायू’ चक्रीवादळ : सुरक्षेसाठी चीनची जहाज भारताच्या आश्रयाला

Subscribe

'चक्री' वादळाचा फटका भारताला बसणार असून सुरक्षेकरता चीनची दहा जहाज भारताच्या आश्रया करता दाखल करण्यात आली आहेत.

भारताच्या पश्चिमकिनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे. संभाव्य चक्रीवादळ वायूपासून वाचवण्यासाठी चीनची दहा जहाज भारताच्या आश्रयाला आली आहेत. या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरावर आश्रय देण्यात आला आहे. तसेच भारतीय तटरक्षक विभागाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत राहण्यास परवानगी दिली असल्याची माहिती भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के आर सुरेश यांनी दिली आहे.

- Advertisement -

नागरिकांना जवान करणार मदत

मुंबईपासून दक्षिणनैऋत्य दिशेने ६३० किमी अंतरावर हे चक्रीवादळ स्थित असून येत्या चोवीस तासात ते आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाणार असल्यामुळे राज्यात हे वादळ धडकण्याची शक्यता नाहीपरंतु त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. तसेच किनारपट्टीच्या भागात व्यापक परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या, बुधवार १२ जून रोजी किनारपट्टीच्या जवळ समुद्र खवळलेला असणार असून १३ जून रोजी कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागात समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मासेमारांनी बुधवार, १२ जून आणि गुरुवार १३ जून रोजी अरबी समुद्रात जाऊ नयेअसे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या वायू वादळाच्या तडाख्याने नुकसान होण्याची शक्यता असल्याने येथील लोकांच्या मदतीसाठी वायुसेनेचे एक विमान नवी दिल्लीहून विजयवाडा येथे एनडीआरएफच्या १६० जवानांना घेण्यास जात आहे. हे जवान गुजरातमध्ये वायू चक्रीवादळात सापडणाऱ्या नागरिकांना मदत करणार आहेत.


हेही वाचा –  अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ; मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -