घरCORONA UPDATELive Update: मुंबई इंडियन्सचा सनरायजर्स हैदराबादवर दणदणीत विजय!

Live Update: मुंबई इंडियन्सचा सनरायजर्स हैदराबादवर दणदणीत विजय!

Subscribe

IPL 2020 मध्ये आज झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये Mumbai Indians ने Sunrisers Hyderabad चा पराभव करत आपल्या खात्यात २ गुणांची कमाई केली आहे. शारजा मैदानाचा विक्रम राखत या सामन्यातही २०० पेक्षा जास्त स्कोअर जाणार हे म्हटलं जात होतं. मुंबईने पहिल्यांदा बॅटिंग करत तब्बल २०८ धावा फटकावल्या. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादचा डाव १७४ धावांवर आटोपला. (वाचा सविस्तर)


पावसामुळे वैभववाडीत भात कापणी खोळंबली

- Advertisement -

चार दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात भात कापणी खोळंबली आहे. पावसाची संततधार पुढे अशीच सुरू राहिल्यास भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आठ दिवसापासून तालुक्यात भात कापणीला सुरुवात शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र गेले चार दिवस सकाळच्या सत्रात मळभ व दुपारी पाऊस हे समीकरण पक्के झाले आहे. पावसाचे वातावरण दिवसभर असल्याने शेती वाळवणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे बनले आहे.ठिकठिकाणी भात शेतीवर किडीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी भातशेतीवर केली आहे. मात्र संततधार पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास शेतकरी आणखी संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.


६० वर्षांत ८५ नव्या प्रजातींना मिळाले नाव

- Advertisement -

पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक जैवविविधता असून, गेल्या ६० वर्षांमध्ये येथे नवीन ८५ प्राण्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये बेडूक, पाल, खेकडे, मासे आदींचा समावेश आहे. या प्रजातींना नाव मिळाल्याची माहिती भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचे पश्चिम प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. पी. एस. भटनागर यांनी दिली. भारतीय प्राणी सर्वेक्षणाचे पुण्यात १९६० पासून विभागीय केंद्र आहे. त्या ठिकाणी अनेक वैज्ञानिक काम करत असून, त्यांनी या ८५ नव्या प्रजाती शोधल्या आहेत. या केंद्रातर्फे सातत्याने प्राण्यांच्या प्रजाती शोधण्यावर संशोधन सुरू असते, त्यांची संपूर्ण माहिती घेणे, त्याबाबत यापूर्वी कुठे माहिती किंवा ती प्रजाती दिसली आहे का ? अशी संपूर्ण माहिती संकलित करून आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ती प्रसिध्द केली जाते. त्यानंतरच नव्या प्रजातीला नाव मिळते आणि ते जाहीर होते, असे डॉ. भटनागर यांनी सांगितले. खरंतर पश्चिम घाटात अनेक प्रजाती आहेत. त्या पुर्वीपासूनच तिथे असतात. पण त्याला नाव नसते. ते समोर आणण्याचे काम संशोधक करीत असतात.


कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक

मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये  पुढाकार घ्यावा,असे आवाहन संभाजीराजे कोल्हापूरमध्ये आयोजित न्यायिक परिषदेत बोलताना केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको या भूमिकेचा पुनरुच्चार केला. EWS आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सरकारला अल्टीमेटम; ८ दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरू


अभिनेत्री तमन्ना भाटियालाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. ऑगस्टमध्ये या अभिनेत्रीच्या पालकांना कोरोना झाला. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. आता अभिनेत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. नमस्ते तेलंगणाने याबाबत वृत्त दिले आहे.


नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. एकनाथ शिंदे यांची दुसरी कोविड १९ चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डॉक्टररांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे.


केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर हार्टसर्जरी करण्यात आली असून याबाबत त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी माहिती दिली आहे.


दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया दिलेल्या माहितीनुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील.


‘I feel better now, लवकरच कोरोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन’ – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगत लवकरच कोरोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन, असे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. तसेच त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. एकत्र येऊन काम करा आणि ते पूर्ण करा, असे ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. (सविस्तर वाचा)


महत्त्वाची बातमी! देशात कोरोनाची लस कधी येणार; आज होणार खुलासा

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. याच दरम्यान कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या लशीत रशियानं पहिला क्रमांक लावला असला तरीही त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची लस, भारत बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉनन्स या तीन कंपन्यांकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. यालशीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र भारतात लस कधी उपलब्ध होणार आणि सर्वात आधी कुणाला मिळणार यासंदर्भात अधिकृतपणे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन माहिती देणार आहेत. (सविस्तर वाचा)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनसंबंधी ते चौकशी करत आहेत.


देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६५ लाख ४९ हजार ३७४ इतका झाला असून गेल्या २४ तासांत ७५ हजार ८२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९४० जणांचा एका दिवसांत मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


देशात आतापर्यंत एकूण ७ कोटी ८९ लाख ९२ हजार ५३४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल, ३ ऑक्टोबर रोजी तब्बल ११ लाख, ४२ हजार १३१ चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


ठाण्यातील वाघबीळ उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला असून पुलावरून जाणारा एक ट्रक कलंडल्याने त्यावर असलेलं कार्डबोर्डचे सर्व सामन पुलाखालून जाणाऱ्या गाडीवर पडले. त्यामुळे गाडीत बसलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा ट्रक कार्डबोर्डचा अतिरिक्त भार घेऊन जात असल्याने एका बाजूला कलंडला असल्याचे बोलले जात आहे.

Major Accident Opp Suraj Water Park in Thane
ठाण्यातील वाघबीळ उड्डाणपुलावर भीषण अपघात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -