घरदेश-विदेशBus Accident : जम्मू काश्मीरमध्ये बसचा भीषण अपघात, घटनेत 25 जणांचा मृत्यू

Bus Accident : जम्मू काश्मीरमध्ये बसचा भीषण अपघात, घटनेत 25 जणांचा मृत्यू

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत बस खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली असून जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ही घटना घडली आहे.

डोडा : जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत बस खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली असून जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी सूत्रांकडून देण्यात आली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 50 ते 55 प्रवासी होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (terrible bus accident in Jammu and Kashmir, 25 people died in the incident)

हेही वाचा – ‘मनोज’ नाव असलेल्या व्यक्तीला स्पेशल ऑफर; ‘या’ हॉटेलचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 50 ते 55 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस किश्तवाडहून जम्मूकडे निघाली होती. यावेळी ही बस डोडाजवळ पोहोचली असता ती दरीत कोसळली. या भागांत वळणावळरचे रस्ते असल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. तर ही बस बस रस्त्यावरून घसरली आणि थेट दरीत कोसळली, असेही सांगण्यात येत आहे. या घटनेत बसची अत्यंत वाईट अवस्था झाली असल्याची माहिती देण्यात आली असून बसचा सापळा दिसून येत आहे. तर जखमींना किश्तवाडा जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, डोडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती या घटनास्थळी बचावकार्य राबविणाऱ्या बचाव पथकाकडून देण्यात आली आहे. या घटनेच 18 जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर मोदींनी या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट लिहित म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे झालेला अपघात दुर्दैवी आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, प्रियजन या अपघातात गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -