घरताज्या घडामोडीदहशतवाद्यांनी संसदेवर १३ डिसेंबरलाच का केला होता हल्ला?

दहशतवाद्यांनी संसदेवर १३ डिसेंबरलाच का केला होता हल्ला?

Subscribe

वीस वर्षांपूर्वी १३ डिसेंबर २००१ साली आजच्याच दिवशी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने फक्त देशालाच नाही तर संपू्र्ण जगाला हादरवून टाकलं होतं.

पाकिस्तानमधील ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या या हल्ल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणांनाच आव्हान केलं होतं. पण आज वीस वर्ष उलटूनही या हल्ल्याचे सूत्रधार मात्र पाकिस्तानमध्ये मोकाट फिरत आहेत.

- Advertisement -

१३ डिसेंबर २००१ या दिवशी नेहमीप्रमाणेच लोकांचा दिवस सुरू झाला होता. अवघा देश आपआपल्या दैनंदिन कामात मग्न होता. मात्र त्याचवेळी एका घटनेने देशात खळबळ उडाली. संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पहील्यांदाच थेट देशाच्या संसदेवर हल्ला करण्याचे धाडस दहशतवाद्यांनी केले होते. दहशतवाद्यांचा सामना करताना अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती.

- Advertisement -

तब्बल ४५ मिनिटं दहशतवादी आणि संसदेवर तैनात असलेल्या  सुरक्षा रक्षक आणि पोलिसांमध्ये  जोरदार चकमक सुरू होती. शेवटी सर्वच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले होते.

हा ह्ल्ला जैशच्या पाच दहशतवाद्यांनी केला होता. थेट संसदेवर हल्ला करण्यामागे देशात दहशत निर्माण करण्याचा , आम्ही कुठेही काहीही करू शकतो हा संदेश जगाला देण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. पण पोलिसांनी सर्वच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

संसदेवर हल्ला करून राजकारणी व्यक्तींना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. पण सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना यश मिळाले नाही. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी दहशतवाद्यांना संसदेच्या बाहेरचं ठार केले. यामुळे दहशतवादी संसद भवनात प्रवेश करू शकले नाहीत. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.  या हल्ल्यात पाच दिल्ली पोलीस, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले. तर १६ पोलीस जखमी झाले होते.

ज्यादिवशी हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी संसदेचे सत्र सुरू होते. यादरम्यान काहीकाळासाठी संसदेच्या दोन्ही सत्रांचे काम स्थगित करण्यात आले होते. तत्त्कालिन पंतप्रधान अटल बिहरी वाजपेयी आणि लोकसभेच्या विरोक्षी पक्ष नेत्या सोनिया गांधी यादेखील हल्ला होण्याच्या काही वेळाआधीच निवासस्थानासाठी निघाले होते.तर त्यावेळचे गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी मात्र संसद भवनात उपस्थित होते.

दरम्यान, या हल्ल्याचा मास्टर माईंड अफजल गुरूला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हल्ल्यासाठी त्याने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. गुरुला २००२ मध्ये दिल्ली हायकोर्ट आणि २००६ साली सुप्रिम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर गुरुने तत्कालिन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी दया याचिका केली होती. पण राष्ट्रपतींनी ती याचिका फेटाळून लावली. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी पहाटे अफजल गुरुला दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -