घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी पंजाबमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून 'अलर्ट' जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी पंजाबमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून ‘अलर्ट’ जारी

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यांच्या नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली असून, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI)चा पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यांच्या नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली असून, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI)चा पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, या कटात पंजाबमधील 10 बडे आणि महत्त्वाचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार त्यांना सुरक्षा देऊ शकते. (Terror alert in Punjab ahead of PM Narendra Modi visit 10 leaders on target ISI hatched a conspiracy)

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर संस्था ISI ने चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याच्या संशयामुळे भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणेच्या या अलर्टनुसार चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा कट असून दहशतवादी बस स्थानकाला लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

भारताच्या गुप्तचर यंत्रणेच्या या अलर्टनंतर पंजाबमध्ये सर्वत्र तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी राज्य पोलीस, जीआरपी आणि राज्य गुप्तचर संस्थेला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील शांतता भंग करण्यासाठी दहशतवादी कट करून घातपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोणताही घातपात होऊ नये यापार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच ज्या लोकांशी ISI चे संबंध आहेत, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी योगी आदित्यनात यांना देण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरूवात केली आहे.


हेही वाचा – सभागृहाचे नियम प्रत्येक सदस्याने पाळायलाच हवेत; उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -