घरदेश-विदेशकाश्मिरी पंडितांनो खोरे सोडा, अन्यथा मरायला तयार व्हा; लष्कर-ए-इस्लामची धमकी

काश्मिरी पंडितांनो खोरे सोडा, अन्यथा मरायला तयार व्हा; लष्कर-ए-इस्लामची धमकी

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून सातत्याने लक्ष्य केले जातेय. अशात पुलवामा येथील हवाल ट्रान्झिट निवासस्थानी राहणाऱ्या एका काश्मिरी पंडिताला लष्कर-ए-इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भातील एक पोस्ट दहशतवाद्यांनी जारी केले आहे. या पोस्टरवर लिहिण्यात आले की, काश्मिरी पंडितांनी काश्मिर खोरे सोडावे अन्यथा त्यांना मृत्यूला तयार राहावे लागेल. या ट्रान्झिट निवासस्थानात राहणारे बहुतेक काश्मिरी पंडित सरकारी नोकरी करतात.

या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले की, ‘सर्व स्थलांतरित आणि आरएसएसचे एजंट काश्मिर सोडून निघून जा नाहीतर मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. जे काश्मीर पंडित ज्यांना काश्मीर हा अजून एक इस्रायल हवा आहे आणि काश्मिरी मुस्लिमांना मारायचे आहे, अशा काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमचा बचाव दुप्पट किंवा तिप्पट करा, टार्गेट किलिंगसाठी तयार रहा. तुम्ही मरणार’. हे पोस्टर हवाल ट्रान्झिट हाऊसिंगच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिले आहे.

- Advertisement -
काश्मिरी पंडितांनो खोरे सोडा, अन्यथा मरायला तयार व्हा; लष्कर-ए-इस्लामची धमकी

नुकतेच जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले. रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला. राहुल हा एक काश्मिरी पंडित होता जो बराच काळ महसूल विभागात कार्यरत होता. मात्र दहशतवाद्यांनी तहसील कार्यालयात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

मात्र, या घटनेनंतर 24 तासांत बांदीपोरामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये मारले गेलेले दोन दहशतवादी राहुल भट्टच्या हत्येत सामील होते. फैजल आणि सिकंदर अशी ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दोघेही पाकिस्तानी आहेत. तिसरा दहशतवादी गुलजार अहमद असून त्याची ओळख 11 मे रोजी झाली होती.

- Advertisement -

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राहुलच्या पत्नीला जम्मूमध्ये सरकारी नोकरी, कुटुंबाला आर्थिक मदत तसेच मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. मात्र या घटनेने संतप्त झालेल्या विस्थापित काश्मिरी पंडितांनी देशात अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. सोबतच या मुद्द्यावरून केंद्र सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. किंबहुना, एकेकाळी विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये स्थायिक करण्याचा सरकारचा दावा आहे. पण दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांच्या लक्ष्यित हत्येमुळे खोऱ्यात दहशत आणि संताप वाढत आहे.


…म्हणून आनंद दिघेंवर बाळासाहेब चिडायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -