घरदेश-विदेशदिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; तिघांना अटक

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; तिघांना अटक

Subscribe

आसाम आणि दिल्लीत स्फोट घडवून आणत दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना आसाममधील गोलपोरा येथून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

आसाम आणि दिल्लीत स्फोट घडवून आणत दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना आसाममधील गोलपोरा येथून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. इस्लाम, रंजीत अली आणि जमाल अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. तिघेही २५ ते ३० वर्षे वयाचे आहेत. जमाल हा बारावी उत्तीर्ण झालेला आहे, मुकद्दीर इस्लाम हा ड्रायव्हर व मासे विक्रीचा व्यवसाय करतो तर रंजीत अली हा मासे विक्रेत्याकडे मॅनेजर म्हणून काम करतो, अशी माहिती उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली.

काय म्हणाले प्रमोद कुशवाह?

आसाममध्ये एका जत्रेत चाचणीदाखल स्फोट घडवून आणायचा आणि नंतर दिल्लीत त्याचप्रकारे स्फोट घडवून आणायचा, असा या तिघांचा कट होता, अशी माहिती उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली. दरम्यान अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींचा ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या तिघांकडून शस्त्रास्त्र तसेच स्फोटक पावडर हस्तगत करण्यात आली आहे. आयईडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी ही पावडर या तिघांकडून कोणत्या माध्यमातून आली याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींकडून जी स्फोटकं बनवण्यात आली आहेत ती स्फोटकं आयसिसच्या व्हिडिओचा आधार घेऊन बनवण्यात आली आहेत, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती कुशवाह यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -