Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश पाकिस्तानच्या दिवाळखोरीला दहशतवाद जबाबदार, देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

पाकिस्तानच्या दिवाळखोरीला दहशतवाद जबाबदार, देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

Subscribe

पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या देशावर आधीच कर्जाचा डोंगर असल्याने पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या देशावर आधीच कर्जाचा डोंगर असल्याने पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर यामुळे हा देश पुढील अनेक वर्ष या संकटातून बाहेर पडू शकणार नाही, असे इस्माईल यांच्याकडून सांगण्यात आले आहे. परंतु देशातील दहशतवादामुळे ही परिस्थिती ओढवले असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण दहशतवादामुळे देशावर ही परिस्थिती ओढवले असल्याचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी मान्य केले आहे. तर याबाबत त्यांच्याकडून गंभीर इशारा देण्यात आलेला आहे. तसेच, जर का पाकिस्तानला या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर त्यांना दर वर्षाला तब्बल 25 अब्ज डॉलर परत करावे लागतील, अशी माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Cyclone Mocha: येत्या 48 तासांत बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची होणार निर्मिती

- Advertisement -

पाकिस्तानात एका ठिकाणी भाषण करताना अर्थमंत्री इस्माईल म्हणाले की, “जर पाकिस्तानने हे संकट संपवले नाही तर हे पुढील अनेक वर्षे असेच राहिल. पाकिस्तान यातून लवकर बाहेर पडू शकणार नाही. सद्यस्थितीत तुम्ही टॅक्स दुप्पट किंवा तिप्पट जरी केला तरी यातून बाहेर निघणे जवळजवळ अशक्य आहे. पाकिस्तानचा परकीय चलनसाठा तळाला गेला आहे. देशातील महागाईनेदेखील उच्चांक गाठला आहे. पाकिस्तानवर डिफॉल्ट होण्याची भीती आहे,”

त्यामुळे आता यापुढे पाकिस्तानला देशावर असलेले कर्ज फेडणे अत्यंत गरजेचे आहे. पाकिस्तान या संकटातून बाहेर येण्यासाठी आयएमएफकडे मदत मागत आहे. परंतु त्यांच्याकडून देखील कर्ज देण्यासाठी नकार देण्यात आलेला आहे. पाकिस्तान एका किचकट परिस्थितीत अडकला असून यामुळे आणखी मोठे संकट निर्माण होण्याची भिती आहे आणि सध्यातरी या संकटातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. पाकिस्तानला दरवर्षी डिफॉल्ट करण्यापासून वाचण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचा महागाई दर 40 टक्क्यांच्या वर गेला असून आयएमएफनुसार यावर्षी विकासदर 0.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन वर्ष तरी परिस्थिती बिकट राहणार आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मोठे बदल करावे लागतील. पाकिस्तानची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अर्थव्यवस्था बांगलादेशपेक्षाही खराब झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानसाठी दहशतवाद मोठे संकट बनला असून कोणतेही परदेशातील देश पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक नसल्याचे अर्थमंत्री इस्माईल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -