Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुलवामात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

पुलवामात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

Subscribe

5 किलो आयईडीसह एकाला अटक

श्रीनगर – भारताचे नंदनवन म्हणल्या जाणार्‍या काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सुरू झाले असून पुलवामा येथे रविवारी मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले. भारतीय जवानांनी रविवारी पुलवामा परिसरातून तब्बल 5 किलोंच्या आयईडी स्फोटकांसह एका दहशतवाद्याला अटक केली.

इश्फाक अहमद वानी असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याची रविवारी रात्री उशिरापर्यंत विविध तपास यंत्रणांमार्फत कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुलवामा येथे काही दहशतवादी लपले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके असल्याची माहिती भारतीय जवानांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार रविवारी या परिसरात जवानांनी शोधमोहीम राबविली.

- Advertisement -

भारतीय जवान येत असल्याची कुणकुण लागताच दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला, परंतु यावेळी पळण्याच्या प्रयत्नात असणार्‍या इश्फाकला पकडण्यात भारतीय जवानांना यश आले. त्याच्याकडून जवानांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही हत्यारेही जप्त केली असून इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -