घरताज्या घडामोडीTerrorist Attack: चार संशयित दहशतवाद्यांसह इतर दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी

Terrorist Attack: चार संशयित दहशतवाद्यांसह इतर दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी

Subscribe

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काल, मंगळवारी पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. यामधील दोन संशयित दहशतवाद्यांना आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पोलिसांनी हजर केले. कोर्टाने इतर दहशतवाद्यांप्रमाणेच या दोघांची १४ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या दोन संशयित दहशतवाद्यांचे नाव जीशान आणि आमिर असं आहे. या दोघांचे साथीदार उबैदुर रहमान आणि हुमैद यांचा पोलीस शोध घेत आहे.

दरम्यान पोलीस या संशयित दहशतवाद्यांना तपासासाठी प्रयागराजला घेऊन जाऊ शकते. यापूर्वी चार दहशतवाद्यांना आज पहाटे कोर्टात हजर केले होते. या चारही जणांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

नक्की वाचा – Terrorist Attack: दहशतवाद्यांनीच केली पाकिस्तानची पोलखोल; कुठे, कोणी दिली ट्रेनिंग वाचा

- Advertisement -
पोलिसांनी जीशान आणि आमिरला कोर्टात हजर केल्यानंतर युक्तिवाद केला की, याप्रकरणाची अजून सखोल चौकशी होणे बाकी आहे. कोर्टात पोलीस म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाचे धागे-दोरे पाकिस्तानसोबत जोडले जात आहेत. तसेच हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानमध्ये जाऊन आले आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांची ट्रेनिंग पाकिस्तानमध्ये झाली आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांची चौकशी करून यांच्या नेटवर्कमध्ये इतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जाईल. शिवाय या दहशतवाद्यांची लॉजिस्टिक्स आणि निधीचा पुरवठा यासंबंधित चौकशी केली जाईल. आता पोलीस पुढील मिशन अटक केलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना शोधणे आहे. यामुळे सध्या उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये छापेमारी सुरू आहे.

हेही वाचा – Terrorist Attack: कोणी शेतकरी तर कोणी MBA होल्डर, वाचा दहशतवाद्यांची प्रोफाईल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -