जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे आतंकवाद्यांचा ग्रेनेट हल्ला, CRPF चे २ जवान शहीद एका नागरिक जखमी

र, काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील खानपोर ब्रिजवर शुक्रवारी सीआरपीएफच्या दलावर ग्रेनेड हल्ला केला.

Terrorist grenade attack at Baramulla, Jammu and Kashmir, 2 CRPF jawans martyred, one civilian injured
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे आतंकवाद्यांचा ग्रेनेट हल्ला, CRPF चे २ जवान शहीद एका नागरिक जखमी

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोडी सुरुच असून जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे आतंकवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहिद झाले आहेत. तर तिथला एक नागरिक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Terrorist grenade attack at Baramulla, Jammu and Kashmir, 2 CRPF jawans martyred, one civilian injured)  ग्रेनेड हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात घेराव घालण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील खानपोर ब्रिजवर शुक्रवारी सीआरपीएफच्या दलावर ग्रेनेड हल्ला केला.

 

जम्मू काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी देखील बारामुल्ला जिल्ह्यात आतंकवाद्यांनी एका पोलीस दलावर ग्रेनेड हल्ला केला होता. बुधवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोणतीही जिवीन हानी किंवा नुकसान झाले नाही. याचवेळी रफियाबाद परिसरातील द्रूसू येथील देखील पोलीसांच्या गस्तीत दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात ग्रेनेड रस्त्याच्या किनाऱ्यावर पडून त्याचा स्फोट झाला होता.


हेही वाचा – CBSE Board 12th Result 2021: आज दुपारी २ वाजता निकाल होणार जाहीर