घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळाचा भांडाफोड, 'लष्कर-ए-तोयबा'च्या चौघांना अटक

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळाचा भांडाफोड, ‘लष्कर-ए-तोयबा’च्या चौघांना अटक

Subscribe

दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलाल मोठे यश आलं आहे. सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामधील ठिकाणांचा भांडाफोड केला आहे. या ठिकाणाहून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा दारुगोळा आणि काही शस्त्रही जप्त केली आहेत. तसेच चार दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. याप्रकरणी आता चौकशी सुरु आहे. दहशतावाद्यांकडून भारतात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट आखला जात होता. मात्र सुरक्षा दलाने कारावाई करत दहशतवाद्यांचा हा कट उधळून लावला आहे. काश्मीर जोन पोलिसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, काश्मीर पोलीस, सुरक्षा दल (42RR) आणि CRPF 180 Bn यांनी संयुक्तपणे हाफू नगीनपूरा जंगलाला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केले. या ऑपरेशनदरम्यान दहशवाद्यांच्या ठिकाणांचा भांडाफोड करत ती ठिकाणं उध्वस्त करण्यात आली. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या या ठिकाणावरून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. याप्रकरणी घटनेच्या कलम 10/2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. या तपासादरम्यान पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए- तोयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात लष्करा ए तोय्यबाच्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिली जात होती, त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. यावर काश्मीर झोनचे एडीजीपी जयकुमार म्हणाले की, 2022 मध्ये काश्मीरमध्ये 93 सर्च ऑपरेशनदरम्यान 172 दहशवाद्यांना ठार करण्यात आलं. हे सर्व दहशतवादी लष्कर-ए- तोयबा, जैश, हिजबुल, अल- बद्र आणि द रेजिस्टेंस फोर्स या दहशतवादी संघटनांमधील होते.


मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणार आणखी ८ तासांचा अवधी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -