अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Terrorist killed in clash between security forces and militants in Anantnag
अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

अनंतनागमध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना खात्मा केला. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आजूनही कारवाई सुरू असल्याचे काश्मीर झोन पोलिसांना सांगितले. एक दिवसापूर्वी पुलवामात एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्राल भागातील मगहमा येथे ही चकमक झाली होती. तर बडगाम जिल्ह्यात सीआरपीएफच्या पार्टीवर झालेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता.

पोलीसांची नाका बंदी –

अनंतनागच्या बिजबेहारा भागातील शितीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर काश्मीर झोन पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली आहे. आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचेही सांगितले आहे.

अभिनेत्री अमरीन भटची हत्या –

काही दिवसांपासून दहशतवादी पुन्हा एकदा काश्मीरमधील सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहेत. काश्मिरी पंडित राहुल भट यांच्यानंतर अलीकडेच दहशतवाद्यांनी बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची गोळ्या घालून हत्या केली होती.