घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याचा खात्मा

Subscribe

जैश ए मोहम्मदसाठी नव्या युवकांना सामील करण्याचे काम लंबू करत होता.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांच्या मोहिमेला यश मिळाले आहे. अवंतीपोरा भागात शनिवारी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ आतंकवाद्यांचा खात्मा केला आहे. यामधील एक आतंकवादी जैश-ए-मोहम्मदचा चीफ मसूद अजहरचा भाचा असून त्याचे नाव इस्माइल उर्फ लंबू आहे. लंबू आईडी एक्पर्ट होता तसेच पुलवामा मध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात लंबूचा सहभाग होता. पुलवामा हल्यात आयईडीचा वापर करण्यात आला होता. तसेच लंबू लथपोरा पुलवामा हल्ल्यच्या कारस्थानामध्ये सहभागी असून एनआएच्या चार्जशीटमध्येही त्याचे नाव होते. खात्मा करण्यात आलेल्या लंबूचा अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता.

मोहम्मद इस्माईल जम्मू-काश्मीरच्या जैश-ए-मोहम्मदचा मुख्य कमांडर होता. मोहम्मद इस्माईल उर्फ लंबू मसद अजहरचा भाचा होता. लंबू बहावलपुरमधील कोसार कॉलनी मध्ये राहत होता. पुलवामात २०२० आणि २०१९ मध्ये झालेल्या हल्ल्यात लंबूचा समावेश होता यामुळे सरक्षा दलाची त्याच्यावर नजर होती. गुप्तचर संस्थेच्या डोजियरनुसार अबू सैफुल्लाहचा जन्म पाकिस्तानात झाला असून दहशतवादी संघटनेच्या देखरेखेखाली तो मोठा झाला आहे. २०१७ मध्ये घुसखोरी करुन भारतात आला आणि अवंतीपोरा, पुलवामा, अनंतनाग या भागात हल्ले करत होता.

- Advertisement -

त्राल भागात दहशतावादी हल्ल्याचा प्रयत्न

मोहम्मद इस्माईल याने त्रालमधील महामार्गाजवळ आपल्या जवळचा साथीदार समीर अहमद डार सोबत दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. समीर अहमद डार पुलवामा जिल्ह्यातील काकपरा भागातील रहिवासी होता. मोहम्मद इस्माईल विदेशी रहिवासी होता यामुळे भारतीय सुरक्षेला त्याचा धोका होता. बुदगाल येथे २०२० मध्ये झालेल्या चकमकीत इस्माईल पळून जाण्यास यशस्वी झाला होता. त्यावेळी एक जवान जखमी झाला होता.

तालिबान्यांशी जवळीक

मोहम्मद इस्माईल अफगानिस्तानमध्ये तालिबान्यांना भेटला होता. इस्माईल गाड्यांमध्ये आयईडी बसवण्यात तरबेज होता. पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल उर्फ लंबू शांती बिघडवण्यासाठी युवकांना दगडफेक आणि हल्ला करण्यासाठी आक्रमक करत होता. तसेच जैश ए मोहम्मदसाठी नव्या युवकांना सामील करण्याचे काम लंबू करत होता. लंबूचा खात्मा केल्यामुळे सुरक्षा दलाला मोठं यश मिळाले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -