घरदेश-विदेशनुपूर शर्मांच्या घातपाताच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्याला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

नुपूर शर्मांच्या घातपाताच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्याला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

Subscribe

सहरानपूर – उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने आज मोठी कारवाई केली. सहरानपूरमधून जैश- ए- मोहम्मद आणि तहरिक-ए- तालिबान पाकिस्तान या संघटनांशी संबंधित कथित दहशतवाद्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दलाचे अपर पोलीस महानिदेशक प्रशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. उत्तर प्रदेश एटीएसने मोहम्मद नदीमकडून एक मोबाईल फोन, दोन सीमकार्ड आणि विविध प्रकारची स्फोटक बनवण्याचे साहित्य जप्त केल्याची माहिती दिली आहे. प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार नदीम जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबानकडून प्रभावित होऊन आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नदीमला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या प्राथमिक पाहणीत त्याचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांशी मेसेच आणि वॉईस मेसेज देखील आढळले आहेत.

- Advertisement -

दीमला आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण –

मोहम्मद नदीम हा व्हाटसअप, टेलिग्राम, मेसेंजर आणि क्लब हाऊसच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता, अशी माहिती एटीएसने दिली आहे. नदीमने ३० हून अधिक दहशतवाद्यांना आभासी क्रमांक आणि सोशल मीडिया अकाऊंट बनवून दिल्याची धक्कादायक माहिती एटीएसने दिली आहे. टीटीपी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी नदीमला आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण दिल्याची बाब देखील तपासात समोर आली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -