श्रीनगरमध्ये BSFच्या पथकावर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील पंडाचमध्ये बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.

terrorists attack on border security force party at pandach srinagar jammu and kashmir
श्रीनगरमध्ये BSFच्या पथकावर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील पंडाचमध्ये बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात बीएसएफचे एक जवान घटनास्थळी शहीद झाले आहेत. तर दुसऱ्या जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान ते शहीद झाले आहेत.

दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी बीएसएफ जवानांकडील शस्त्रे हिसकावून पलायन केले असल्याचे समोर आले आहे. तर या हल्ल्यानंतर परिसरात घेराबंदी करण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हातात घेण्यात आली असून यावेळी बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे.


हेही वाचा – ट्रम्प म्हणतात, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ही अमेरिकेसाठी अभिमानाची बाब