दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा काश्मिरी पंडित टार्गेटवर; पुलवामातील गोळीबारात एकाचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका काश्मिरी पंडिताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संजय शर्मा असे या मृत काश्मिरी पंडिताचे नाव आहे. या गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते.

Jammu kashmir sia raids many places for terrorist funding many important documents seized

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका काश्मिरी पंडिताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संजय शर्मा असे या मृत काश्मिरी पंडिताचे नाव आहे. या गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते. गोळी झाडल्यानंतर संजय शर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. (Terrorists Fired On Kashmiri Pandits In Pulwama Jammu Kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार, संजय शर्मा हे पुलवामातील अचन भागात राहणारे रहिवाशी आहेत. रविवारी संजय शर्मा हे काही कामानिमित्त बाजारात जात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले. मात्र त्याला वाचवता आले नाही.

या गोळीबारानंतर संजय शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्रीही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी आसिफ अली यांच्यावर हल्ला केला होता. आसिफ अली नमाज अदा करून मशिदीतून परत येत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना घेरले. बिजबिहारा भागातील हसनपोरा तवेला येथे दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.


हेही वाचा – समाजाच्या सामर्थ्याने देशाची शक्ती वाढते, ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य