जम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुलवामा जिल्ह्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेवर शनिवारी दुपारच्या सुमारास ‘ग्रेनेड हल्ला’ करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.
Jammu & Kashmir: Terrorists lobbed grenade near SBI branch in Pulwama, today. No casualties/injuries reported. pic.twitter.com/IsUSy1Lemt
— ANI (@ANI) March 30, 2019
बनिहाल येथे कारमध्ये सिलेंडरचा स्फोट
श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे आज सकाळी एका कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घजली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाल्याचे कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.