घरताज्या घडामोडीJammu Kashmir : श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, २ पोलीस कर्मचारी जखमी

Jammu Kashmir : श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, २ पोलीस कर्मचारी जखमी

Subscribe

गेली अनेक दिवस जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहेत.

Jammu Kashmir :  जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने आतंकवादी हल्ले सुरू आहेत. सेंट्र्ल काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या रैनालारी येथे आतंकवाद्यांकडून भारतीय सुरक्षा रक्षकांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तर काही किरकोळ जखमी झालेत. ग्रेनेड हल्ल्यानंतर रैनावारी परिसरातील सुरक्षा वाढवली असून संपूर्ण परिसरात सैनिकांनी घेराव घातला आहे.

- Advertisement -

मंगळवारीही श्रीनगरच्या जुनिमार भागात दहशतवादी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एक सैनिक गंभीररित्या जखमी झाला होता. परंतु जखमी सैनिकाला तिथून पळ काढण्यात यश आले. जखमी सैनिकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सरपंचावर अंदाधुंद गोळीबार

- Advertisement -

जम्मू काश्मीरमध्ये नापाक कारस्थान सतत वाढत आहेत. दहशतवादी भारतीय सैनिकांसोबतच सर्वसामान्यांना देखील लक्ष करत आहेत. सातत्याने हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैनिक गुंतले आहेत. गेली अनेक दिवस जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहेत.

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियान छोटेपोरा गावात सुट्टीवर गेलेल्या CRPFच्या जवानाची दहशतवाद्यांकडून गोळी घालून हत्या


हेही वाचा – हैदराबादच्या सिंकदराबामध्ये भीषण आग दुर्घटना, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -