Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लसीकरण : कोरोनाच्या बचावासाठी केंद्राकडून चतुःसूत्री जाहीर

टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लसीकरण : कोरोनाच्या बचावासाठी केंद्राकडून चतुःसूत्री जाहीर

Subscribe

Corona Update in India | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक सरासरी १५०० रुग्णांची वाढ होत असल्याने केंद्र सरकारने पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Corona Update in India | नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट (New Variant of Corona) समोर येत असून या म्युटेशनवर डॉक्टर अभ्यास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक सरासरी १५०० रुग्णांची वाढ होत असल्याने केंद्र सरकारने पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

हेही वाचा – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्राकडून सूचना जारी; या खबरदारी घेण्याचे आवाहन

- Advertisement -

२५ मार्च रोजी देशात १५९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. 146 दिवसांतील ही सर्वांधिक नोंद आहे. तर, राज्यात काल, रविवारी ४३७ कोरोना रुग्णांची नोंद होऊन दोघांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातही कोरोना प्रतिबंधक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. एवढंच नव्हे तर गेल्या पाच आठवड्यात कोरोना संसर्गाची संख्या नऊ पटीने वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविडविरोधात सामना करण्याकरता टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि टीकाकरण (लसीकरण) या टी चतुःसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्रात XBB.1.16 सबव्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे; कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ?

- Advertisement -

मार्गदर्शक तत्वे काय?

  • पाच दिवसांपेक्षा जास्त वेळ खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • व्हायरल फ्लूची शंका असल्यास अँटीबायोटीकचा वापर करू नये.
  • मास्कचा वापर करा.
  • सुरक्षित अंतर ठेवा.
  • शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी याचे निरिक्षण करा

सध्या देशात ९ हजार ४३३ सक्रीय रुग्ण असून आजपर्यंत ४४१६३८८३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, आतापर्यंत ५३०८३१ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर, लसीकरणाचा वेग वाढल्याने भारतात २२०६५,५२,५७९ एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

बुधवारी एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे नव्याने आढळलेले सबव्हेरिएंट कारणीभूत असू शकतात. परंतु हे नवे व्हेरिएंट गंभीर आजार वा मृत्यूला कारणीभूत ठरत नाहीत तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही.

गुलेरिया म्हणाले की, जेव्हा कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा तो अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांसह झाला. अशा प्रकारे व्हायरस बदलत राहिला. सुदैवाने, जर आपण गेल्या एका वर्षाचा विचार केला तर असे प्रकार समोर आले आहेत जे ओमिक्रॉनचेच उप-प्रकार आहेत. त्यामुळे हा विषाणू काही प्रमाणात स्थिर झालेला दिसतो आणि पूर्वीप्रमाणे वेगाने बदलला नाही.

- Advertisment -