Texas School Shooting : अमेरिकेच्या शाळेत अज्ञाताकडून बेछूट गोळीबार, १८ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षकांचा मृत्यू

TexasSchoolShooting 18 year old Shooter boy Killed 18 student and 3 teacher in Texas School
Texas School Shooting : अमेरिकेच्या शाळेत अज्ञाताकडून बेछूट गोळीबार, १८ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षकांचा मृत्यू

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये नरसंहाराची घटना घडली आहे. एका अज्ञाताकडून टेक्सासमधील एका शाळेत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यो गोळीबाराच्या घटनेत १८ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीसुद्धा शोक व्यक्त केला आहे. टेक्सास राज्याच्या सिनेटरने दिलेल्या माहितीनुसार एकूण २१ जणांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. गोळीबार करणारा इसमसुद्धा पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून प्रत्युत्तर देताना झालेल्या गोळीबारात ठार झाला आहे. हल्ला करणारा अज्ञात इसम १८ वर्षांचा होता याबाबतची माहिती टेक्सासचे गवर्नर ग्रेग एबॉट यांनी दिली आहे.

टेक्सासच्या रॉब एलिमेंटरी स्कूल या प्राथमिक शाळेमध्ये गोळीबाराची भीषण घटना घडली आहे. गोळीबार करणारा तरुण अवघ्या १८ वर्षांचा होता. या गोळीबारात एकूण १८ विद्यार्थी आणि शिक्षकांसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ग्रेग एबॉट यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

आता वेळ आली आहे – अमेरिका राष्ट्राध्यक्ष बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गोळीबाराच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. बायडेन यांनी म्हटलं आहे की, देवाच्या नावावर आपण किती काळ बंदूक लॉबीसाठी उभं राहणार, त्याविरुद्ध आपण काय करु शकतो? ज्या पालकांनी आपल्या मुलांना गमावले आहे. ते पुन्हा आपल्या मुलांना पाहू शकणार नाहीत. त्यांच्याबाबत विचार करण्याची गरज आहे. आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. आपल्याला त्या लोकांना दाखवावं लागेल जर त्यांनी कायद्याविरोधात भूमिका घेतली तर माफ केले जाणार नाही, अशा शब्दात जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तरुणाने गाडी शाळेच्या परिसरातच गाडी सोडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा तरुण त्याच शाळेतील माजी विद्यार्थी आहे. ही घटना एँटोनियोपासून ८० किमी पश्चिमेकडे असलेल्या उवाल्डे या भागात घडली आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाने शाळेच्या परिसरात गाडी सोडली आणि शाळेत दाखल झाला. त्याच्याकडील बंदुकीने अंधाधूंद गोळीबार केली. तरुणाकडे एक हँड गनसुद्धा होती.

यापूर्वीसुद्धा झालाय शाळांमध्ये गोळीबार

अमेरिकेमधील शाळेत गोळीबाराची ही पहिलीच घटना नाही आहे. यापूर्वी २०२१ मध्येसुध्दा टेक्सासच्या एका शाळेत गोळीबाराची घटना घडली होती. सँडी हुक असे या शाळेचे नाव आहे. यामध्ये एकूण २६ लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता दुसऱ्यांदा टेक्सासमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.

एक राष्ट्र म्हणून आपल्याला विचारायचे आहे की आपण देवाच्या नावावर किती काळ गन लॉबीसाठी उभे राहणार आहोत आणि त्याविरुद्ध आपण काय करू शकतो? जे पालक आपल्या मुलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीत, त्यांचा विचार करण्याची गरज आहे. आता कारवाई करण्याची वेळ आली आहे.


हेही वाचा : श्रीलंकेत एका रात्रीत पेट्रोल 82 तर डिझेल 111 रुपयांनी महागले, इंधनांच्या दरांनी गाठला उच्चांक