घरदेश-विदेशThackeray group about EC : निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून..., ठाकरे...

Thackeray group about EC : निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भारताचा निवडणूक आयोग सत्यास धरून प्रामाणिक निर्णय घेईल, याची शक्यताच नव्हती. कारण निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून तो मोदी-शहा यांचा झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? अशी चौफेर टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : सर्व्हे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता मोदींसोबत जाण्याची – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच पक्षातील फुटीर आयतोबा अजित पवार यांच्या हवाली केला याचे आश्चर्य किंवा खंत वाटण्याचे कारण नाही. याच पद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ‘आयतोबा’ एकनाथ मिंधे यांच्या हाती सोपवली गेली. म्हणजे तुम्ही बेइमानी करून, भ्रष्टाचार करून भाजपाच्या गोटात या, आम्ही तुमचा ‘पक्ष’ तुमच्या ताब्यात देतो, हीच ‘मोदी गॅरंटी’ आहे व लोकशाहीसाठी तो सगळ्यात मोठा धोका आहे, , असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

विधिमंडळातील बळ म्हणजे खरा राजकीय पक्ष नाही, विधिमंडळातील पक्ष वेगळा व पक्ष संघटन वेगळे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण ‘शिवसेना’ प्रकरणात असतानाही निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता लोकशाही व संविधानाची संपूर्ण हत्या करण्यासाठी हे सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले जाईल, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bhaskar Jadhav : …काँग्रेस आपला वापर करत नाही ना? भास्कर जाधवांचा सवाल

शरद पवार यांनीच अजित पवारांना सर्वार्थाने मोठे केले, पण गांडुळाने समुद्रावर दावा करावा असे आता घडले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष जनमानसात रुजलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या कागदी निर्णयाने त्यांच्या अस्तित्वावर फरक पडणार नाही. मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक महाराष्ट्रीय जनतेला मूर्ख समजले काय? जेथे ‘ठाकरे’ तेथेच शिवसेना व जेथे ‘शरद पवार’ तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, हाच महाराष्ट्रीय जनतेचा मानस आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेना जेव्हा याच पद्धतीने मिंधे यांच्या हाती सोपवली तेव्हा याच अजित पवारांनी जाहीरपणे सांगितले होते, ‘‘हे बरोबर नाही. पक्ष ज्यांनी स्थापन केला त्यांच्याकडून काढून घेतला, चिन्ह काढून घेतले. हे निवडणूक आयोगाने केले, पण हे जनतेला पटले का?’’ हे अजित पवारांनी शिवसेनेच्या बाबतीत तेव्हा सांगितले, पण आज त्याच पद्धतीने अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला व जिंकला. आता हे तरी लोकांना पटते का याचे उत्तर अजित पवार व त्यांच्या फुटीर मंडळाने द्यायला हवे, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांची एस काँग्रेस ते राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्षापर्यंतची वाटचाल

निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल. एकनाथ मिंधे, अजित पवार यांनी महाराष्ट्राचे गारदी म्हणून काम केले आणि गारद्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असे विश्वासही या अग्रलेखातून ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -