घरदेश-विदेशThackeray group : जे झुकले त्यांना इतिहास माफ करणार नाही, ठाकरे गटाचा...

Thackeray group : जे झुकले त्यांना इतिहास माफ करणार नाही, ठाकरे गटाचा शिंदे-नितीश कुमारांवर निशाणा

Subscribe

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केंद्रातील मोदी सरकारसमोर झुकायला तयार नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झुकण्यास नकार दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढायला सिद्ध आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गुडघे टेकले नाहीत, रडले नाहीत आणि झुकले नाहीत. एखाद्या क्रांतिवीराप्रमाणे त्यांनी तुरुंगाचा मार्ग स्वीकारला. या लढ्यातूनच देशाला नवी दिशा आणि स्वातंत्र्याचा प्रकाश मिळेल. जे झुकले, शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘मन की बात’ आणि ‘जन की बात’मध्ये फरक, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

- Advertisement -

हेमंत सोरेन यांचा तुरुंगवास हा स्वाभिमान व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आदर्श ठरावा. हेमंत सोरेन विश्वासदर्शक ठरावाचे मतदान करण्यासाठी झारखंड विधानसभेत पोहोचले तेव्हा त्यांच्या आमदारांच्या भावना अनावर झाल्या. अनेकांना हुंदके फुटले. जणू स्वातंत्र्य रक्षणासाठी ते सभागृह स्वाभिमानाच्या अश्रूंनी भिजले. त्या भावविवश वातावरणात हेमंत सोरेन यांनी जे वक्तव्य केले ते ऐतिहासिक ठरावे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

सोरेन म्हणाले, ‘रडू नका, माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत, पण मी अश्रू ढाळणार नाही. हे अश्रू मी जपून ठेवीन. वेळ येईल तेव्हा या अश्रूंच्या ठिणग्या होतील.’ सोरेन यांनी पुढे सांगितले ते महत्त्वाचे. ते म्हणाले, ‘राजभवनात प्रथमच एका मुख्यमंत्र्याला अटक झाली. आता इतकेच पाहायचे की, राष्ट्रपती भवनात, लोकसभा अध्यक्षांच्या निवासस्थानी अटकांना कधी सुरुवात होते,’ असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP vs Thackeray group : भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा कुंटणखाना, ठाकरे गटाचा हल्लाबोल

देशाचे भयावह भविष्यच सोरेन यांनी सांगितले. लोकशाही व संविधान धोक्यात असल्याची ही हाक आहे. भ्रष्टाचार, खून, बलात्कार, दरोडेखोरी करून भाजपात गेल्यावर अभय व मुक्ती मिळते आणि जे या दरोडेखोरीत सामील होण्यास नकार देतात त्यांना राजभवनात अटक करून तुरुंगात टाकले जाते. देशात हेच सुरू आहे. हेमंत सोरेन यांनी लढणाऱयांच्या अश्रूंचे मोल सांगितले. त्या अश्रूंतूनच उद्याचे वादळ निर्माण होईल, असा आशावादही या अग्रलेखाच्या माध्यमातून शिंदे गटाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Amruta Fadnavis : “….मी आणलंय विकासाचं वाण”, अमृता फडणवीसांच्या उखाण्याची सर्वत्र चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -