घरदेश-विदेशThackeray group : मोदी सरकारचे ‘व्यावसायिक प्रेम’ जगजाहीर, ठाकरे गटाचा घणाघात

Thackeray group : मोदी सरकारचे ‘व्यावसायिक प्रेम’ जगजाहीर, ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

मुंबई : देशातील व्यावसायिक गॅस सिलिंडर सुमारे तीस रुपयांनी स्वस्त झाला आहे. ‘व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते’ अशा पिपाण्या वाजविणाऱ्या मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर ‘जैसे थे’च का ठेवले? ते का कमी केले नाहीत? मोदी सरकारचे ‘व्यावसायिक प्रेम’ जगजाहीर असले तरी गॅस सिलिंडरमध्येही असा भेदभाव करण्याचे कारण काय? असा परखड सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Aaditya Thackeray: भारतात एप्रिल फूल ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा होतो; आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

- Advertisement -

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने म्हणे सिलिंडरचे दर स्वस्त केल्याची ‘खुशखबर’ सामान्य जनतेला दिली. तशा पिपाण्याच सत्तापक्षातर्फे फुंकल्या जात आहेत. तुम्ही तुमच्या या बिनआवाजाच्या पिपाण्या खुशाल वाजवा, परंतु लोकसभा निवडणूक नसती तर ही दरकपात झाली असती का? या प्रश्नाचे उत्तर आधी द्या, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून सुनावले आहे.

केंद्र सरकारने कितीही आव आणला तरी दरकपातीचे हे लॉलीपॉप दाखविण्यामागे लोकसभा निवडणुकीचे सुरू असलेले पडघम आहेत, हे जनतादेखील ओळखून आहे. मागील दहा वर्षांत मोदी सरकारच्या या जुमलेबाजीचा, फसवाफसवीचा अनुभव जनतेने अनेकदा घेतला आहे. आता तरी त्यापेक्षा वेगळे काय होणार आहे? असा सवालही या अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला दिलासा; निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई नाही

एका व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 30 रुपये 50 पैशांनी कमी झाला आहे. म्हणजे, मुंबईत हे सिलिंडर आता 1717.50 रुपयांना उपलब्ध असेल. कोलकातामध्ये हीच किंमत 1879 रुपये तर चेन्नईमध्ये 1930 रुपये असेल. हे दर कमी झाल्याने सामान्य माणसाच्या खिशावरील बोजा थोडा हलका होईल, हे मान्य केले तरी दरकपातीचे हे सुख त्याला किती काळ मिळणार हा मुख्य प्रश्न आहे. कारण निवडणूक होईपर्यंत ही दरकपातीची पुंगी वाजवली जाईल आणि निवडणूक संपताच ती मोडून-तोडून खाऊन फस्त केली जाईल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Sadan scam : भुजबळ पुन्हा अडचणीत; उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -