घरदेश-विदेशThackeray group : ...पंतप्रधानाने देशासाठी काहीच केलेले नाही, ठाकरे गटाचा घणाघात

Thackeray group : …पंतप्रधानाने देशासाठी काहीच केलेले नाही, ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

मुंबई : राजकारणात एखाद्याकडे सांगण्यासारखे फार काही नसले की तो स्वतःच्या जातीवर येतो. स्वतःची जात काढतो. जातीबाबत हातघाईवर येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच केले आहे. पंतप्रधान स्वतःची जात वगैरे सांगून रडायला लागतो आणि त्यावर मते मागतो तेव्हा बेशक समजावे, या पंतप्रधानाने जनतेसाठी तसेच देशासाठी काहीच केलेले नाही आणि जात हाच त्याचा मुख्य आधार आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Rupali Chakankar : पायाखालची जमीन सरकली की काय? शाईफेक प्रकरणावरुन चाकणकर आक्रमक

- Advertisement -

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, “मी ओबीसी आहे.’’ 2014 साली ते महागाई, भ्रष्टाचार कमी करण्याच्या मुद्दय़ांवर मते मागत होते. 2019 साली ‘पुलवामा’तील हुतात्म्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला आणि आता राममंदिराबरोबर ते स्वतःची जात चालवू पाहत आहेत. हा प्रकार धक्कादायक आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मोदी हे स्वतःला ‘ओबीसी’ असल्याचे सांगतात. पण ही त्यांची थापेबाजी असून मोदी देशाला फसवत आहेत, असे राहुल गांधी यांनी पुराव्यासह समोर आणले. मोदी हे नकली ओबीसी आहेत. मोदी यांचा जन्म मोढ घांची जातीत झाला. उत्तरेत ही जात ‘तेली’ म्हणून ओळखली जाते. गुजरातमध्ये ही जात आधी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट नव्हती. केंद्रात भाजपाचे राज्य आल्यावर त्यांनी आपल्या मोढ घांची जातीचा समावेश ‘ओबीसी’त केला. मोदी गुजरातच्या सधन आणि समृद्ध जातीत जन्मास आले तसेच राजकीय लाभासाठी त्यांनी स्वतःची जात ‘ओबीसी’त घातली. त्यामुळे मोदी यांचा ते ‘ओबीसी’ वगैरे असल्याचा आक्रोश खोटा आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule On Patel: खरंच, वय हा फक्त आकडा असतो; सुळेंचा पटेलांना टोला

गुजरात सरकारच्या समाज कल्याण विभागाने 25 जुलै 1994 रोजी एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार नव्या 36 जाती ओबीसी प्रवर्गात सामील केल्या. त्यातील 25(ब) क्रमांकावर मोढ घांची जातीचा समावेश असून त्या जातीस ओबीसीमध्ये सामील केले गेले. आता आपले पंतप्रधान मोदी हे ज्या श्रीमंत मोढ घांची जातीतून आले ती जात नेमकी आहे तरी काय? या जातीचे लोक घाण्यापासून बनवल्या जाणाऱ्या तेलाचा व्यापार करतात आणि त्या व्यापारातून ते बऱ्यापैकी समृद्ध झाले. ही जात गरीब किंवा गरीब रेषेखाली नसल्याचे सांगितले जाते. अर्थात ते काही असले तरी दहा वर्षे पंतप्रधानपदाचे वैभव भोगणाऱ्या व्यक्तीने आपण ‘ओबीसी’ जातीचे असल्याचा आक्रोश करणे योग्य आहे काय? असा सवालही ठाकरे गटाने केला आहे.

मोदी यांचा सूट-बूट दहा-पंधरा लाखांचा, मनगटावरील घड्याळ पाच लाखांचे, खिशाला पेन चार लाखांचे, वीस हजार कोटींचे विमान त्यांनी स्वतःच्या उड्डाणासाठी खरेदी केले. त्यामुळे अशा व्यक्तीने मी या किंवा त्या जातीचा आहे असे वारंवार बोलणे बरे नाही, असे देखील ठाकरे गटाने सुनावले आहे.

हेही वाचा – CM Shinde : गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद आम्हीच संपवला; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -