घरदेश-विदेशThackeray Group : हा तर राजकीय कर दहशतवाद; उद्धव गटाचा हल्लाबोल

Thackeray Group : हा तर राजकीय कर दहशतवाद; उद्धव गटाचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच ईडीने घोटाळ्याचा ठपका ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्याहीपूर्वी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच करवसुलीसंदर्भात आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन आता इंडिया आघाडीसह विरोधक आक्रमक झाले असून रविवारी रामलीला मैदानात अनेक पक्षांमधील बड्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला आहे. या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने आपले मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

“मोदींप्रमाणे सीतारामनही खोटे बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थखाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब सतीसावित्रीचा आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पाहत आहेत,” अशा शब्दात उद्धव गटाने त्यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LPG Price Rate: मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

…हा तर भाजपचा रडीचा डाव

“राजकीय विरोधकांची आर्थिक कोंडी करून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वीच नामोहरम करण्याचे मोदी-शहांनी ठरवले आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचाच वापर सुरू आहे. आयकर विभागाने काँग्रेसला नोटीस बजावली असून 1823 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली. इन्कम टॅक्सने हा नवा उद्योग ईडी, सीबीआयच्या भागीदारीत सुरू केला. विरोधकांच्या हातात लढण्यासाठी कोणतीही साधने राहू नयेत, एकदम दुबळे किंवा पंगू करून त्यांना निवडणूक मैदानात ढकलायचे आणि अशा विषम स्थितीत मैदान मारायचे असा रडीचा डाव भाजपने सुरू केला आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपने हे वारंवार केले,” असा आरोप ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

- Advertisement -

आयकर विभाग भाजपाला नोटीस कधी पाठवणार?

“निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, विरोधकांना मदत करणाऱ्या पाठीराख्यांवर इन्कम टॅक्स, ईडीच्या धाडी पडल्याच म्हणून समजा. भाजपने गैरमार्गाने प्रचंड माया आणि साधनसंपत्ती गोळा केली. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करून जी लुटमार केली त्यातून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून साधारण 8 हजार कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले. ही सर्व 5-6 वर्षांतील कमाई आहे. काँग्रेसच्या खात्यात 300 कोटी नाहीत तिथे त्यांना 1,823 कोटी रुपये भरण्याचे फर्मान, पण 8 हजार कोटीवाल्या भाजपला सर्व गुन्हे माफ. कर भरण्यासाठी जो नियम आणि न्याय काँग्रेसला लावला तोच नियम भाजपला लावला तर त्यांच्याकडून 4,617 कोटींचा दंड वसूल करावा लागेल, पण इन्कम टॅक्स भाजपला नोटीस पाठवायला तयार नाही. हा एक प्रकारे राजकीय कर दहशतवाद आहे,” असं उद्धव गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा – Shirur Lok Sabha Constituency : अढळरावांच्या प्रचारात दिलीप वळसेंची साथ नाही; दुखापतग्रस्त हाताचं कारण

ही माहिती इन्कम टॅक्सकडे नाही का?

“काँग्रेसपाठोपाठ भारतीय कम्युनिस्ट पार्टीलासुद्धा इन्कम टॅक्सने नोटीस पाठवून 11 कोटी रुपये दंड आकारला. तृणमूल काँग्रेसला 72 तासांत 15 नोटिसा मिळाल्या. समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना यांनाही अशाच पद्धतीने छळले जात आहे. मोदी आणि भाजप ‘चारशे पार’ करण्याची गर्जना करीत असले तरी प्रत्यक्षात हे लोक घाबरले आहेत आणि सत्ता हातून निसटत असल्याच्या भीतीने या असल्या कारवाया करीत आहेत,” असा टोला उद्धव गटाने लगावला आहे. “अनेक करबुडव्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. निवडणूक रोखे घोटाळ्यात किमान 17 कंपन्या अशा आहेत की, भाजपने त्यांना कोट्यवधीची करमाफी देऊन त्या बदल्यात निवडणूक रोखे घेतले. या गुन्ह्यांची माहिती इन्कम टॅक्सकडे नाही असे सांगणे मूर्खपणाचे आहे,” असंही उद्धव गटाने म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -