घरदेश-विदेशथायलंडची 'ती' गुहा बनणार म्युझिअम!

थायलंडची ‘ती’ गुहा बनणार म्युझिअम!

Subscribe

थायलंडची थाम लुआंग गुहा पर्यटनस्थळ म्हणून आधीपासूनच प्रसिद्ध होती. अशातच नवीन म्युझिअम आता पर्यटकांना आणखीन आकर्षित करेल. याशिवाय या घटनेवर आधारित चित्रपट बनवणार असल्याचीही चर्चा आहे.

थायलंडच्या थाम लुआंग गुहेचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून जगभरात गाजत होतं. या गुहेमध्ये गेलेली १२ लहान मुलं दुर्देवाने तब्बल १३ दिवसांसाठी गुहेतच अडकली होती. मात्र, अखेर त्यांच्यासाठी राबवण्यात आलेली बचाव मोहीम यशस्वी झाली आणि सर्व मुलांना गुहेतून सुखरुप बाहेर काढण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून ताजं असलेलं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. लवकरच थायलंडच्या या थाम लुआंग गुहेजवळ एक प्रशस्त वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या मुलांचा नेमकी कशाप्रकारे सुटका करण्यात आली, त्यावेळी काय परिस्थिती उद्भवली होती, हे फोटोंच्या आणि वस्तूंच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. थायलंडची थाम लुआंग गुहा पर्यटनस्थळ म्हणून आधीपासूनच प्रसिद्ध होती. त्यामुळे प्रतिवर्षी या गुहेला भेट हजारोंच्या संख्येने भेट देतात. अशातच हे नवीन म्युझिअम आता पर्यटकांना आणखीन आकर्षित करेल.

घटनेवर बनणार चित्रपट?

- Advertisement -

दरम्यान थायलंडमध्ये झालेल्या या थरार प्रकरणावर लवकरच चित्रपट बनणार असल्याची चर्चा रंगते आहे. दोन चित्रपट निर्मात्या कंपनी या घटनेवर चित्रपट बनवण्यास उत्सुक असल्याचं समजत आहे. प्युअर फ्लीक्स आणि लॉस एंजल्समधील इवानहो पिक्चर्स या कंपनीज चित्रपट बनवण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतं आहे. कशाप्रकारे ही मुलं गुहेत अडकली याचा संपूर्ण घटनाक्रम, त्यांना वाचवण्यासाठी राबवण्यात आलेलं बचावकार्य तसंच बचाव करणारे अधिकारी आणि प्रत्यक्षात या दिव्यातून गेलेली ती सर्व लहान मुलं या सर्वच गोष्टींवर या चित्रपटामध्ये प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान ‘मुलांना वाचवण्यासाठीचे बचावकार्य नेमके कसे करण्यात आले, हे सांगणारा एक खास कार्यक्रम या गुहेजवळ दाखवण्यात येईल’, अशी माहिती बचावकार्य मोहिमेचे प्रमुख आणि माजी गव्हर्नर नोरोंग्साक ओसोत्तानकोर्न यांनी दिली आहे. तसंच यापुढे गुहेला भेट द्यायला येणाऱ्या सर्व पर्यंटकांच्या संरक्षणाची विशेष काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -