घरताज्या घडामोडी'जप्त केलेल्या पैशांशी माझा संबंध नाही, माझ्याविरोधात कट रचला'; 'त्या' घोटाळ्याप्रकरणी पार्थ...

‘जप्त केलेल्या पैशांशी माझा संबंध नाही, माझ्याविरोधात कट रचला’; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जींचा खुलासा

Subscribe

जप्त केलेले पैसे माझे नाहीत. मी आजारी आहे. या पैशाशी माझा काही संबंध नाही', असे माजी कॅबिनेट मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे. गेल्या २३ जुलैला पार्थ चटर्जी यांना ईडीने शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केली होती. ईडीने चटर्जी यांच्यासह अन्य १२ जणांच्या घरांवर छापेही टाकले होते.

‘जप्त केलेले पैसे माझे नाहीत. मी आजारी आहे. या पैशाशी माझा काही संबंध नाही’, असे माजी कॅबिनेट मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे. गेल्या २३ जुलैला पार्थ चटर्जी यांना ईडीने शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केली होती. ईडीने चटर्जी यांच्यासह अन्य १२ जणांच्या घरांवर छापेही टाकले होते. एका छाप्यात चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपयांच्या नोटा व अन्य मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच, अर्पिता यांच्या दुसऱ्या घरातूनही २७ कोटी ९० लाख रुपये व ६ किलो सोने सापडले होते. मात्र ईडीने जप्त केलेले पैसे आपले नसल्याचा मोठा खुलासा पार्थ चॅटर्जी यांनी केली आहे. (That money is not mine Partha Chatterjee after second cash seizure from close aide residence)

पत्रकारांनी पार्थ चॅटर्जी यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचा हवाला दिला. तसेच, “जप्त करण्यात आलेले पैसे माझे नाहीत. मी आजारी आहे. या पैशाशी माझा काहीही संबंध नाही. माझ्याविरोधात कोणी कट रचला. वेळ आल्यावर सर्व काही समजेल”, असे म्हटले.

- Advertisement -

पक्षातील वरिष्ठ नेतृत्वासह सर्वांनाच शाळेतील शिक्षक म्हणून नोकरी मिळवून देण्यासाठी अपात्र उमेदवारांकडून जमा केलेल्या पैशाची माहिती होती. याबाबत पार्थ चॅटर्जी यांनी दावा केला की त्यांनी कधीही उमेदवारांकडून पैसे मागितले नाहीत किंवा स्वीकारले नाहीत. तसेच, पक्षाचा हुकूम होता आणि तो आदेश पाळत होतो. इतरांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर त्याला स्वाक्षरी करायची होती. इतरांनीही पैसे गोळा करून त्याच्याकडे पाठवले. पैसे सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या. नंतर शेकडो कोटी रुपये पक्षाच्या वापरासाठी घेतले गेले. या रकमेपैकी केवळ एक अंश जप्त करण्यात आला असल्याचा खुलासाही केल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपूर्वी ममता सरकारने पार्थ चॅटर्जी यांच्यावर कारवाई केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. परंतु, शिक्षणमंत्री असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार”; ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -