Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश ...म्हणून भारत करतो रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी

…म्हणून भारत करतो रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी

Subscribe

 

नवी दिल्लीः युक्रेनसोबत युद्ध करत असल्याने अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देश रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी करत नाही. मात्र भारत रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाची खरेदी करतो. कच्चा तेलावर प्रक्रिया करुन भारत जगभरात तेलाची विक्री करतो. महत्त्वाचे म्हणजे कच्चा तेलावर गुजरात येथे शुद्धीकरण केले जाते.

- Advertisement -

युरोपीयन देशातील फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथील सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. युरोपीयन देशांनी निर्बंध घातले असतानाही रशियाकडून भारत, चीन, तुर्की, युएई आणि सिंगापूर हे पाच देश स्वस्तात कच्चा तेलाची खरेदी करतात. या पाच देशांना लॅंड्रोमॅट म्हटले जाते. यामध्ये भारत आघाडीवर आहे. भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाची खरेदी करतो. तेलाचे शुद्धीकरण करतो. शुद्धीकरण केल्यानंतर ते तेल युरोपीयन देशांना विकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

‘ब्लूमबर्ग’चा अहवाल आणि एनालिटिक्स फर्म ‘केप्लर’चा अहवालही CREA च्या अहवालाशी मिळताजुळता आहे. CREA च्या अहवालानुसार, गुजरातमधील सिक्का आणि वाडीनार या दोन बंदरांमधून सर्वाधिक तेल उत्पादनांची निर्यात केली जात आहे. रिलायन्सच्या मालकीच्या जामनगर रिफायनरी आणि वाडीनार येथील नायरा एनर्जीकडून ही डिझेल निर्यात होते.  या अहवालावर भारत सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

- Advertisement -

मार्च महिन्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने जयपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०९ रुपये झाले होते तर डिझेल शंभरीच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा महागाईची छळ बसली होती.

मार्च महिन्यात कच्चा तेलाच्या किमतीत २ डॉलरने वाढ झाली. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोलच्या किमतीत ६८ पैशांनी वाढ झाली. तेथे पेट्रोल प्रति लिटर १०९ रुपये झाले होते. तर डिझेल २ रुपयांनी वाढले असून ९४.६१ पैसे प्रति लिटर झाले होते.

दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये तर डिझेल ८९.८२ रुपये होते. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर होते. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये तर डिझेल ९४.२४ रुपये होते. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये तर डिझेल ९२ रुपये प्रति लिटर झाले होते. गाझियाबादमध्ये पेट्रोल ९६.२६ रुपये तर डिझेल ८९.९५ रुपये होते.

 

- Advertisment -