९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १७ वर्ष पूर्ण

तब्बल १७ वर्षांपूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होत. अत्यंत भीषण असलेल्या या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. या घटनेचा बदला घेत अमेरिकेने अल कायदाचा प्रमुख कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा २०११ साली खात्मा केला.

Bomb blast in america
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला

संपूर्ण अमेरिकेला हादरवून टाकणारी घटना २००१ साली घडली होती. ९ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर्सवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेला आज १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळचा जागतिक पातळीवरील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनने हा हल्ला घडवून आणला होता. अल-कायदाने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. हा अमेरिकेवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे बोलले जात होते. यापूर्वी २६ फेब्रुवारी १९९३ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या पार्किंगमध्ये एका गाडीत स्फोटक भरुन बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.

ट्विन टॉवर तासाभरात कोसळले 

अल-कायदामधील १९ दहशतवाद्यांनी ९/११ ला अमेरिकेतील चार विमानांचे अपहरण केले होते. त्यापैकी दोन विमानांना त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर नेले आणि न्यूयॉर्क शहरातील ट्विन टॉवर्सला या विमानांनी धडक दिली. त्यामुळे विमानातील प्रवाशांसह इमारतीमधील अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले. दोनही इमारती दोन तासांच्या आत पत्त्यांसारख्या कोसळल्या. दहशतवाद्यांनी तिसरे विमान वॉश्गिटन डी. सी. च्या बाहेर आर्लिंगटन, वर्जीनियातील पेंटागनशी धडकवले. तर चौथ विमान हे दहशतवाद्यांकडून ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्यात जवळपास ३ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १९ अपहरण झालेल्यांना मारून टाकण्यात आले होते.

हल्ल्याचा बदला घेत लादेनचा खात्मा 

दहशतवाद्यांच्या या हल्ल्याचे देशाभरातून पडसाद उमटू लागले. सर्वांनीच या हल्ल्याचा निषेध केला. तर अमेरिकेने आपण या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देऊ असे म्हटले. त्यानुसार बरोबर १० वर्षांनी ९/११ च्या हल्ल्याचा बदला घेत अमेरिकेने ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला. अल-कायदा ही दहशतवादी संघटना चालवणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला २ मे २००१ रोजी अमेरिकेच्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मारले.

 ९/११ वरील दहशतवादी हल्ल्यातील ठळक मुद्दे 

  • अल कायदाच्या १९ दहशतवाद्यांचा एकाच वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटर, पँटॉगॉन आणि पेनिसिल्व्हेनियामध्ये दहशतवादी हल्ले
  • या हल्ल्यात तब्बल २,९७७ लोकांचा मृत्यू
  • ९/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांकडून चार विमानांचे अपहरण
  • अमेरिकन ११, युनायटेड ७५, अमेरिकन ७७ आणि युनायटेड ९३ या विमानांचे अपहरण
  • अमेरिकन ११ विमानात १५८ पैकी ८१, युनायटेड १७५ मध्ये १६८ पैकी ५६, अमेरिकन ७७ मध्ये १७६ पैकी ५८ तर युनायटेड ९३ मध्ये ३७ प्रवासी
  • त्यातील दोन विमानांनी ट्विन टॉवर उध्वस्त केले
  • ९/११ च्या हल्ल्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्विन मनोरे उध्वस्त
  • यापूर्वी २६ फेब्रुवारी १९९३ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या पार्किंगमध्ये एका गाडीत स्फोटक भरुन बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता
  • यात सहा जण ठार झाले तर एक हजार जण जखमी झाले होते